Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळात निघाली भरती, 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज

Ahilyanagarlive24 office
Published:

Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, मुख्याध्यापक, सहाय्यक. शिक्षक, लिपिक, शिक्षक ज्यु. कॉलेज, अकाउंटंट” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 5 मे असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी 10 वी 12 वी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे आहे त्याअगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे आहे.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील गरजेचे आहे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

 PDF जाहिरात I

PDF जाहिरात II

ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करा I

ऑनलाईन अर्ज करा II

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe