युनियन बँकेत पदवीधरांसाठी आहे नोकरीची सुवर्णसंधी! 500 पदांसाठी होणार भरती; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख

युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिकाऊ म्हणजेच अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेतून बँक एकूण पाचशे शिकाऊ पदे भरणार आहे व त्याकरिताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Ajay Patil
Published:
bank job

भारतामध्ये सध्या पदवीधर असलेल्यांची संख्या आणि त्यामानाने उपलब्ध नोकऱ्यांचे प्रमाण खूपच व्यस्त म्हणजेच उलट असून नोकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पदवीधर हे बेरोजगार असल्याची सद्यस्थिती आहे. तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर बरेच विद्यार्थी हे विविध भरती संदर्भात तयारी करत असतात.

यामध्ये रेल्वे भरती पासून तर देशातील संरक्षण क्षेत्र असो की देशातील बँकिंग क्षेत्र असो या सगळ्यांमधील भरतीसाठी वाट पाहत असतात.

याच पद्धतीने तुम्ही देखील पदवीधर असाल व बँकेच्या परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी असून युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिकाऊ म्हणजेच अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेतून बँक एकूण पाचशे शिकाऊ पदे भरणार आहे व त्याकरिताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 युनियन बँकेत भरले जाणार 500 अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ पदे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील महत्त्वाच्या असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये पाचशे शिकाऊ म्हणजेच अप्रेंटिस पदांच्या भरती करिता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही राज्यातील उमेदवारांना अर्ज करता येणार असून अर्ज करताना उमेदवारांना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ते केवळ त्यांच्या राज्यात नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात.

 काय आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता?

युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 500 शिकाऊ पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.

 काय आहे वयोमर्यादेची अट?

युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या भरती करिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांचे वय हे 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे व वयाची गणना ही एक ऑगस्ट 2024 पासून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये प्रवर्गनिहाय कमाल वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. जसे की ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयात तीन वर्षे व एससी आणि एसटी कॅटेगिरी येथील उमेदवारांना वयात पाच वर्ष अपंग प्रवर्गातील उमेदवारांना दहा वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या एकूण पाचशे शिकाऊ पदांच्या भरती करिता जे इच्छुक व

पात्र उमेदवार असतील ते 28 ऑगस्ट पासून अर्ज करू शकतात व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 पर्यंत असून उमेदवारांना unionbankofindia.co.in ह्या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.

 या भरतीकरिता उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्याकरिता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे व ही शंभर गुणांची परिक्षा असणार असून या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा सीटीबी मोडमध्ये असणार असून यासाठी 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना मेडिकल साठी बोलावले जाईल व अंतिम निवड ही मेरिट लिस्ट म्हणजेच गुणवत्तेद्वारे  केली जाईल. या भरतीविषयी अधिक माहिती हवी असेल तर बँकेकडून जारी करण्यात आलेली जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe