Women Business Idea: महिलांनो घरी बसून करा ‘हे’ व्यवसाय आणि कमवा लाखोत! वाचा व्यवसायाची ए टू झेड माहिती

women business idea

Women Business Idea:- आजकाल महिला वर्ग कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नसून अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. अगदी देशाच्या संरक्षण क्षेत्रापासून तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायांमध्ये देखील महिला अग्रस्थानी आहेत.

तसेच अनेक महिला या घरकाम म्हणजेच हाउसवाइफ असतात. अशा महिलांच्या मनामध्ये बऱ्याचदा येते की घरी राहून काहीतरी व्यवसाय करावा.जेणेकरून कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल व रिकामा वेळचा देखील सदुपयोग होईल. अशाच महिलांसाठी आम्ही या लेखामध्ये काही बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्या महिलांना घरी बसून लाखो कमाई करून देऊ शकतात.

 महिलांसाठी असलले महत्त्वाचे घरगुती व्यवसाय

1- घरातून साड्या विकण्याचा व्यवसाय साडी महिलांमध्ये अतिशय महत्वाची असून  फंक्शन किंवा फेस्टिवल मध्ये महिला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचा वापर करतात. भारतात महिला वर्गाकडून साड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या अनुषंगाने तुम्ही घरी बसून साड्या विकण्याचा व्यवसाय करू शकतात व महिन्याला 20 ते पंचवीस हजार रुपये आरामात कमवू शकता. तसेच तुम्ही होलसेल साड्या खरेदी करून घरी बसून विक्री करू शकता. त्यासोबतच एखादे छोटेसे दुकान उभारून तुम्ही त्या माध्यमातून साड्यांची विक्री करू शकतात. याकरिता तुम्हाला मुंबई, दिल्ली तसेच सुरत  इत्यादी ठिकाणी होलसेलमध्ये साड्या खरेदी कराव्या लागतील.

2- मेणबत्तीचा व्यवसाय मेणबत्ती तयार करण्याचा व्यवसाय हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. जर तुम्ही सोशल मीडियावर बघितले तर तुम्हाला कळते की मेनबत्तीचा बिजनेस खूप मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. कारण बऱ्याच इव्हेंटमध्ये मेणबत्ती वापरण्याची सध्या क्रेझ असल्यामुळे व त्यासोबतच मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये देखील मेणबत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व्यवसायामध्ये चांगली संधी आहे.

आजकाल मेणबत्तीचा वापर सजावटीसाठी जास्त प्रमाणात केला जातो. मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच हॉटेल्स, बर्थडे तसेच मॅरेज ॲनिवरसरी आणि रेस्टॉरंटमध्ये देखील मेणबत्यांची मागणी वाढतेच आहे. आजकाल वेगवेगळ्या मेणबत्ती बाजारामध्ये उपलब्ध असून त्यांना चांगली मागणी आहे. हा व्यवसाय तुम्ही पंधरा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करून महिन्याला 30 ते 35 हजार रुपये आरामात कमवू शकतात.

3- मेहंदी काढण्याचा व्यवसाय भारतामध्ये महिलांना मेहंदी लावायला खूप आवडते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीच्या डिझाईन बाजारामध्ये उपलब्ध आहेत.या दृष्टिकोनातून मेहंदीचा एक चांगला ट्रेंड बनला आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये हाताला मेहंदी लावण्याची क्रेझ महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे लग्न ते रिसेप्शन, सणउत्सव इत्यादीमध्ये महिला मेंदी लावतात. आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात मेहंदी क्लासेस उपलब्ध आहेत.

तुम्ही क्लास जॉईन करून परफेक्ट मेहंदी डिझाईन शिकलात तर तुम्ही या व्यवसायातून चांगला पैसा मिळवू शकता. कारण प्रत्येकालाच परफेक्ट डिझाईनची मेहंदी काढता येत नाही. त्यामुळे तुम्ही क्लास लावून मेहंदी काढायला शिकलात तर या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात. हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमीत कमी गुंतवणूक आणि आर्थिक नफा जास्त आहे. हा व्यवसाय तुम्ही साईड बिझनेस म्हणून देखील करू शकतात व लाखो रुपये कमवू शकतात.

4- रेसिपी/ पाककला क्लास आपण पाहतो की समाजामध्ये बऱ्याच महिला रेसिपी क्लासेस घेऊन चांगला पैसा मिळवत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारचे भांडवल लागत नाही. रेसिपी व्यवसाय असा व्यवसाय आहे की तो कधीही बंद पडू शकत नाही. तुम्ही रेसिपी क्लास घेऊन किंवा you tube चैनल क्रिएट करून सुद्धा या माध्यमातून चांगला पैसे मिळवू शकतात. या व्यवसायात गुंतवणूक खूप कमी व पैसा जास्त मिळतो.

जर तुम्ही नवनवीन रेसिपी पोस्ट केल्या तर तुम्ही चांगली कमाई करू शकतात. यूट्यूबच्या माध्यमातून रेसिपी क्लासेस घेऊन अनेक महिला चांगले पैसे मिळवत आहेत. व्यवसाय  फक्त एक तास करून तुम्ही चांगला पैसा या माध्यमातून मिळतात.

5- कंटेंट रायटर क्लासेस तुमच्याकडे चांगले लिहिण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही कंटेंट रायटर बनून चांगली कमाई करू शकतात. या व्यवसायाला देखील कमीत कमी भांडवल लागते. तुम्हाला ज्या विषयाबद्दल चांगली माहिती आहे किंवा रस असेल अशा विषयावर तुम्ही लिहू शकता व चांगले पैसे मिळवू शकतात. तसेच या माध्यमातून तुम्ही ब्लॉगिंग साठी कंटेंट रायटर म्हणून काम करू शकतात व चांगले पैसे मिळवू शकतात. आजकाल इंटरनेटवर  ब्लॉगिंगसाठी कंटेंट रायटरसाठी खूप जागा असतात आणि तिथून तुम्ही खूप सारी कमाई करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe