जगातल्या ‘या’ विद्यापीठातून फ्री मध्ये करा हा अभ्यासक्रम पूर्ण! 1 लाख रुपये महिना पगाराची मिळेल नोकरी

Published on -

विद्यार्थी कुठल्याही अभ्यासक्रमाला जेव्हा ऍडमिशन घेतात तेव्हा प्रत्येकाचा कल हा उत्तम आणि प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठात ऍडमिशन व्हावे किंवा नामांकित अशा कॉलेजमधून आपल्याला शिक्षण मिळावे याकडे प्रामुख्याने असतो. तुम्ही ज्या पद्धतीचे शिक्षण घ्याल किंवा ज्या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण कराल त्याच क्षेत्रामध्ये किंवा त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या नोकऱ्या तुम्हाला मिळतात.

परंतु जर अशा नामांकित असे विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता देखील भासते व अभ्यासक्रमानुरूप त्यासाठीचे डोनेशन म्हणजेच फी तुम्हाला भरावी लागते. परंतु जर जगामध्ये प्रसिद्ध व अव्वल स्थानावर असलेल्या विद्यापीठांमध्ये जर तुम्हाला फ्री मध्ये

एखादा अभ्यासक्रम पूर्ण करायचे संधी मिळाली व त्या माध्यमातून जर तुम्हाला लाख रुपये पगाराची नोकरी मिळत असेल तर किती चांगले होईल. अगदी याच पद्धतीची संधी जागतिक स्तरावरील नामांकित असलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मोफत कोर्स पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेले व अव्वल स्थान मिळवलेले स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मोफत कोर्स पूर्ण करण्याची संधी देण्यात आलेली असून या विद्यापीठाच्या माध्यमातून स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सायबर सिक्युरिटी कोर्स अगदी मोफत करता येणार आहे. ही यूनिवर्सिटी सायबर सिक्युरिटीमध्ये आता अनेक ऑनलाईन प्रोग्राम ऑफर करत असून या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना असे माहिती तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीच्या सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी जसे की सायबर हल्ले कसे टाळावे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे इत्यादी बद्दल शिकवले जाणार आहे.

तसेच या प्रगत सायबर सुरक्षा कार्यक्रम अशा व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे जे नेटवर्क सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक मालमत्तेचे सुरक्षा तसेच सायबर हल्ल्यांपासून त्यांचे संरक्षण आणि ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहेत आणि त्यांना या क्षेत्रातले त्यांचे ज्ञान वाढवायचे आहे

अशांकरिता हा अभ्यासक्रम खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ऑफर केलेला हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र देखील मिळणार असून ते तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताना बायोडाटा सोबत जोडू शकणार आहेत व त्यामुळे तुमच्या अर्जाला वेटेज प्राप्त होणार आहे.

 हा अभ्यासक्रम किती कालावधीचा आहे?

या विद्यापीठाकडून सायबर सिक्युरिटीवर अनेक अभ्यासक्रम आता उपलब्ध करून दिले आहेत व यामध्ये दोन तासापासून ते आठ ते दहा तासांपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये तुम्ही तुमची वेळ आणि गरज यानुसार अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमात विषय आणि प्रवेश याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या https://online.stanford.edu/ या वेबसाईटवर घेता येणार आहे.

 सायबर सुरक्षा तज्ञांना किती मिळतो पगार?

सायबर सुरक्षा तज्ञ म्हणून लाखो रुपयांचे पगार किंवा पॅकेज मिळते. जर आपण भारताचाच विचार केला तर चार ते नऊ वर्षाचा अनुभव असलेल्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सरासरी पगार वर्षाला 12 लाख रुपये इतका असतो. म्हणजेच महिन्याला एक लाख रुपये पगार या व्यक्तींचा असतो. या क्षेत्रातला दहा ते वीस वर्षांचा कामाचा अनुभव असेल तर अशा सायबर सुरक्षा तज्ञांचा वार्षिक पगार हा 22 ते 23 लाख रुपये इतका असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News