ZP Ahmednagar Bharti 2023 : 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; वाचा सविस्तर

Ahmednagarlive24
Published:

ZP BHARTI 2023 : अखेर जिल्हा परिषद भरतीची वाट बघणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. कारण जिल्हा परिषद गट क अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी आता इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. येथे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून, येथे अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे देखील गरजेचे आहे. चला या भरती विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया-

रिक्त पदांचे नाव

वरील भरतीअंतर्गत आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेवक (महिला), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, मुख्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), जोडारी व इतर सर्व पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता

येथे अर्ज करण्यासाठी 10वी, 12वी, पदवीधर तसेच इतर सर्व शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

नोकरी ठिकाण

ही भरती सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणीं होत  आहे.

मासिक वेतन

वरील पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 24,500 ते 81,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.

एकूण पदे

जिल्ह्यांनुसार वेगवेगळी संख्या असेल.

अर्ज पद्धती

येथे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रूपये इतकी फी असेल.

अर्ज सादर करण्याची तारीख

05 ऑगस्ट 2023 म्हणजे आजपासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. लक्षात घ्या अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 ऑगस्ट 2023 रोजी अर्ज स्विकारण्यास बंद होतील. देय तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया

यासाठी ऑनलाईन लेखी परीक्षा जिल्हा स्तरावर आयोजीत केली जाईल.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 पुर्ण झाले झालेले असावे.

भरती कालावधी

या भरती अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे.

ऑनलाईन अर्जाची लिंक

अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा, आणि मगच या पदांसाठी अर्ज करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe