शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची 25% अग्रीम 412 कोटींची रक्कम, वाचा माहिती

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी खरिपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना  25% अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिला असून त्यामुळे आता 412 कोटींची रक्कम जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Ajay Patil
Published:

यावर्षी महाराष्ट्र मध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली व या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरीप हंगामात बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तसेच अतिवृष्टी परिस्थिती निर्माण होऊन देखील खरीप हंगामातील महत्त्वाचे असलेल्या सोयाबीन,

कापूस तसेच तूर, मूग आणि उडीद या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी खरिपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना  25% अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिला असून त्यामुळे आता 412 कोटींची रक्कम जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी पीक विम्याची 25 टक्के अग्रीम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तुर, मूग आणि उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरिपाच्या पिक विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले असून ही अग्रीम 412.30 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार आहे.

पंतप्रधान पिक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबी अंतर्गत जालना जिल्ह्यातील सर्व मंडळातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी युनिव्हर्सल सॉपी जनरल इन्शुरन्स कंपनीस पिक विमा देण्यात आलेले आहेत.

जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी पर्जन्यमान 603.1 इतके आहे व सन 2024-25 मध्ये 812.4 मिमी इतका पाऊस पडलेला आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत 134.9% पाऊस जास्त झालेला आहे.

जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी 141.8 मिलिमीटर इतका पाऊस बरसलेला आहे व या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूरपरिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

या काळात पिक विमा कंपनीकडे 4 लाख 87 हजार 834 पूर्व सूचना प्राप्त झालेले आहेत. मुसळधार पावसामुळे दोन लाख 55 हजार 519 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

यात दोन लाख 82 हजार 538 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असल्याचे विमा कंपनीने सर्वेक्षणात नोंद केलेले आहे.यानुसार 412.30 कोटी रकमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनाकडे करण्यात आलेली असल्याची माहिती जालना जिल्ह्याचे कृषी अधीक्षक यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe