10 गुंठे शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीतून वर्षाला घेतो 3 लाख उत्पन्न! वाचा या शेतकऱ्याची जिद्दीची कथा

जालना तालुक्यातील हिवर्डी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले पुंजाराम भुतेकर यांची यशोगाथा पाहिली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना खूप प्रेरणा देणारी आहे. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने शेडनेट उभारून भाजीपाला लागवड आणि इतर जोडधंद्यांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती केलेली आहे.

Updated on -

शेतीमध्ये थोडीशी कल्पना आणि त्या कल्पनेला तंत्रज्ञानाची जोड दिली तर कमी क्षेत्रामध्ये लाखोत उत्पन्न मिळवणे आता शक्य झालेले आहे. तसेच आता तरुणांनी मोठ्या प्रमाणावर शेतीकडे मोर्चा वळवल्याने शेतीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात बदलाचे वारे वाहताना आपल्याला दिसून येत आहेत.

शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण आता भाजीपाला पिकांपासून तर वेगवेगळ्या फळ पिकांची लागवड करून आर्थिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

अगदी याच मुद्द्याला  धरून जर आपण जालना तालुक्यातील हिवर्डी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले पुंजाराम भुतेकर यांची यशोगाथा पाहिली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना खूप प्रेरणा देणारी आहे. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने शेडनेट उभारून भाजीपाला लागवड आणि इतर जोडधंद्यांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती केलेली आहे.

 शेडनेटमध्ये भाजीपाला लागवड करून घेतात लाखोत उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना तालुक्यातील हिवर्डी या गावचे शेतकरी पुंजाराम भुतेकर यांनी कष्टाच्या जोरावर शेतीमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिकांची लागवड करतात आणि त्यातून यशस्वीपणे चांगले उत्पादन ते घेत आहेत व त्यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांची लागवड करत आधुनिक शेतीची कास धरली आहे.

पुंजाराम हे जेव्हा तीन वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले व संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये दारिद्र्य हे पाचवीलाच पुजलेले होते व अशा परिस्थितीमध्ये त्यांनी चार एकर कोरडवाहू शेती करायचा निर्णय घेतला व यामध्ये मात्र त्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते.

परंतु या परिस्थितीवर देखील मात करत त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. अगोदर शेती करत असताना पारंपारिक पिके जसे की कपाशी आणि सोयाबीन यांची लागवड ते प्रामुख्याने करायचे. परंतु तुलनेने मात्र यातून खर्चाच्या मानाने उत्पन्न खूप कमी मिळत होते.

परंतु शेतीमध्ये काहीतरी बदल करावा या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू झाले व त्यातच त्यांचे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी त्यांच्याशी संपर्क झाला व त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी शेती करायला सुरुवात केली व शेतीला जोडधंदे म्हणून दुग्ध व्यवसाय तसेच शेळीपालन व्यवसाय देखील सुरू केले.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी या उद्देशाने त्यांनी दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली व भाजीपाला उत्पादन घेऊ लागले. या भाजीपाला उत्पादनातून वर्षाला खर्च वजा जाता ते साडेतीन लाख रुपये नफा मिळवतात. साधारणपणे शेडनेट मधील भाजीपाला शेतीतून त्यांना आर्थिक स्थिरता आता मिळाली आहे.

 शासनाने घेतली त्यांची दखल

खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत परिस्थिती असताना देखील त्यांनी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले व परिस्थितीला न जुमानता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे सुरू ठेवले व त्यातच एक प्रयोगशील शेतकरी म्हणून आज ते ओळखले जातात. त्यांच्या या सगळ्या कष्टाची राज्य शासनाने देखील दखल घेतली व 2018 मध्ये त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News