अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ७२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. विविध पिकांच्या ५ लाख १५ हजार ४४९ हेक्टरवर खरीप पेरण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख ३० हजार ९२९ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये फक्त ३.८ मिलीमीटर पाऊस झाला. मागील २० दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आठ दिवस पाऊस न झाल्यास पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ५ लाख १५ हजार ७४९ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात भात पिकाचे सरासरी क्षेत्र १८ हजार ७४५ असून आतापर्यंत ६०५० हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली. बाजरीचे सरासरी ८९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ४४ हजार ३१४ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली. मका पिकाचे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ७७ हजार ९९९ हेक्टर असून आतापर्यंत ६६ हजार ५४६ हेक्टरवर मकाची पेरणी झाली. जिल्ह्यात तूर पिकाखालील ६४ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ५२ हजार ९४ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. जिल्ह्यात मूग पिकाखालील ५१ हजार ९८० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ४० हजार ९१३ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. उडीद पिकाखालील जिल्ह्याचे ६७ हजार ५९५ हेक्टर क्षेत्र आहे. उडीदाची आतापर्यंत ६० हजार ९ हेक्टरवर पेरणी झाली.

भुईमुगाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ६५९९ हेक्टर असून आतापर्यंत भुईमुगाची २८५० हेक्टरवर पेरणी झाली. तीळ पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ८३.३८ हेक्टर आहे. आतापर्यंत १३ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली. सूर्यफूल पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र २१७ हेक्टर आहे. आतापर्यंत २८ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली. सोयाबीनचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ५३८ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ३० हजार ९२९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली.
जिल्ह्यात कपाशीखालील सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ३२८ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९ हजार ५७५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात. सध्या जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. परंतु पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरलेली पिके धोक्यात आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आहे.
खरीप हंगामातील पिकांची पेरणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. प्रत्यक्ष पेरणी झालेली पिके उगवण क्षमतेत व रोपे वाढीच्या आवस्थेत आहेत. तसेच सद्यस्थितीत पिकांवर कोणताही किड अथवा रोग आढळून आला नाही, असे कृषी विभागाने सांगितले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात या सप्ताहात ढगाळ हवामान आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. मे मध्ये अतिवृष्टी झाली. मात्र ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली.
पेरेलेली खरिपाची पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
अहिल्यानगर जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पेरलेली पिके माना टाकत आहेत. अजून आठ दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आहे. जून महिन्यात सुमारे ८०.२ मिमी पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात मागील तीन दिवसांत फक्त ३.८ मिमी पावसाची नोंद झाली. परंतु हा पाऊस सर्वदूर नाही. पाणलोट क्षेत्रातच पाऊस पडत आहे. अन्य भागात पावसाने उसंत दिली आहे. पावसाने लांबल्याने पिके माना टाकत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.
पाथर्डी व श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनअखेर आतापर्यंत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये नगर तालुक्यात ७३.१ मिमी, पारनेर ११४.८ मिमी, श्रीगोंदा ९०.५ मिमी, कर्जत ७८ मिमी, जामखेड ६३.९ मिमी, शेवगाव ६७.८ मिमी, पाथर्डी ५०.८ मिमी, नेवासा ५८.८ मिमी, राहुरी ७७.६ मिमी, संगमनेर १०१.८ मिमी, अकोला १६१.२ मिमी, कोपरगाव ७१.२ मिमी, श्रीरामपूर ५३.४ मिमी, राहाता ६८.८