करमाळ्याच्या अभिजीत पाटीलने सिव्हिल इंजिनिअरिंग करून सुरू केली शेती! लाल केळीच्या उत्पादनातून 4 एकरात मिळवले 35 लाखांचे उत्पन्न

उच्चशिक्षित तरुण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये येत आहेत त्या क्षेत्राच्या पार चेहरामोहराच बदलून गेलेला आपल्याला दिसून येतो. असे उच्चशिक्षित तरुण आता मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्राकडे वळले आहेत व शेतीमध्ये पारंपारिक शेती पद्धतीने फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके तसेच फळ पिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असून कमीत कमी क्षेत्रात देखील लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.

Ajay Patil
Published:
abhijeet patil

अनेक उच्च शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर बेरोजगार असून उदरनिर्वाहासाठी आता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. कारण सध्या नोकरींची उपलब्धता खूपच कमी असल्याने बेरोजगारीची गंभीर समस्या पूर्ण देशापुढे आ वासुन उभी आहे.

त्यामुळे आता अनेकजण व्यवसायाकडे वळले आहेत. परंतु अशा प्रकारचे उच्चशिक्षित तरुण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये येत आहेत त्या क्षेत्राच्या पार चेहरामोहराच बदलून गेलेला आपल्याला दिसून येतो. असे उच्चशिक्षित तरुण आता मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्राकडे वळले आहेत व शेतीमध्ये पारंपारिक शेती पद्धतीने फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके तसेच फळ पिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असून कमीत कमी क्षेत्रात देखील लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.

अगदी याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या वाशिंबे या गावचे उच्चशिक्षित अभिजीत पाटील या तरुणाने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले व नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचे ठरवले व लाल केळीची लागवड यशस्वी केली आहे. याचा अभिजीतची यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.

 लाल केळी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या वाशिंबे या गावच्या अभिजीत पाटीलने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले. परंतु नोकरीच्या मागे न लागता त्याने शेती करण्याचे ठरवले. जेव्हा त्याने शेती करण्याचे ठरवले तेव्हा लाल केळीची लागवड करावी हे निश्चित करून लाल केळीची लागवड केली.

चार एकरमध्ये त्याने या लाल केळीची लागवड केली व 60 टन केळीचे उत्पादन मिळवले आहे. विशेष म्हणजे या सगळ्या उत्पादनातून त्याला सर्व खर्च वजा जाता 35 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. लाल केळी गेल्या काही दिवसांपासून खूप प्रसिद्ध होत असून मोठ्या शहरांमधील उच्चभ्रू वर्गात या केळीची क्रेझ मोठी आहे.

 अशाप्रकारे केले उत्तम विक्री नियोजन

साधारणपणे 2015 मध्ये अभिजीत पाटील शेती क्षेत्रामध्ये आला व तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत व ते यशस्वी देखील केले. असाच प्रयोग म्हणून डिसेंबर 2020 मध्ये चार एकरमध्ये त्याने लाल केळीची लागवड केली.

जेव्हा सुरुवातीला त्याला लाल केळीचे उत्पादन मिळाले तेव्हा ते कुठल्याही बाजारपेठेत न विकता त्याने स्वतःचे मार्केटिंग स्किल वापरले आणि पिकवलेली लाल केळी दिल्ली,मुंबई व पुणे टाटा आणि रिलायन्सच्या मॉलमध्ये विकली या सगळ्या विक्री कौशल्यातून त्याला चार एकरामध्ये तब्बल 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

 का वाढत आहे लाल केळीची मागणी?

आरोग्यासाठी लाल केळी खूप फायद्याची समजली जाते. या केळीची साल लाल रंगाची असते व आतील फळ मात्र पिवळ्या रंगाचे आहे. या केळीमध्ये साखरेचे प्रमाण मर्यादित असते व ही केळी कॅन्सर आणि हृदयरोगापासून व्यक्तीला दूर ठेवू शकते.

जर एक केळ जरी रोज खाल्ले तरी देखील शरीराला आवश्यक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. विशेष म्हणजे ही केळी खाल्ल्यामुळे डायबिटीस सारखा आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe