Agriculture Business Idea : शेतीत तोटा होतोय का? मग ‘या’ चार पिकांची लागवड करा, बाजारात कायम असते मागणी, होणार लाखोंची कमाई

Ajay Patil
Published:

Agriculture Business Idea : तेलबिया पिकांसाठी (Oilseed Crops) भारतात मोठी बाजारपेठ आहे. येथे खाद्यतेलाचा वापर अधिक आहे, तसेच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातूनही बहुतांश खाद्यतेलाची (Edible Oil) निर्यात केली जाते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, तेलबिया पिकांचा कोणताही भाग कचऱ्यात जात नाही. जिथे त्याच्या बियांपासून तेल काढले जाते, तिथे तेलानंतर उरलेला भाग प्राण्यांसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो ज्याला ऑईल केक, महाराष्ट्रात अनेक भागात ढेप म्हणून यांना ओळखले जाते.

त्याच वेळी, तेलबिया पिकांची पाने आणि देठ देखील जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरतात. यामुळेच भारतातील शेतकरी (Farmer) तेलबिया पिकांची लागवड (Farming) करून चांगले पैसे कमवू (Farmer Income) शकतात. भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या तेलबिया पिकांमध्ये भुईमूग, मोहरी, तीळ आणि जवस यांचा समावेश होतो.

तीळ लागवड

तिळाला लक्झरी तेल म्हणजे महाग तेल देखील म्हटले जाते, जे पौष्टिकतेची खाण आहे. तिळीचे तेल देशात आणि परदेशात खूप महाग विकले जाते. खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यात याची लागवड केली जाते. भारत हा याचा प्रमुख उत्पादक देश आहे, जिथे भारतातील तिळाची लागवड तसेच मधमाशी पालन, तेल प्रक्रिया अनेक सौंदर्य उत्पादने आणि खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरली जातात. एवढेच नाही.  परफ्यूम आणि औषधे बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो, त्यामुळे त्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

जवस लागवड

भारतातील प्रमुख तेलबिया पिकांमध्ये जवसाची गणना केली जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जवसचा वापर पेंट, वार्निश, प्रिंटिंग इंक आणि खाद्यतेल म्हणून केला जातो.  बहुतेक लोक बियांच्या स्वरूपात फ्लेक्ससीड्स देखील खातात. जरी त्याची लागवड अनेक देशांमध्ये केली जात असली तरी, भारतात त्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली जाते ज्यामुळे जवसची भारतातून बहुतेक देशांमध्ये निर्यात केली जाते.

भुईमूग शेती

सुका मेवा, तेल आणि तेलाच्या पोळीसाठी भुईमूग पिकाला बाजारात मागणी आहे. हे एक प्रमुख तेलबिया पीक तसेच नगदी पीक आहे, ज्याची लागवड गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील भुईमूग लागवड विशेष उल्लेखनीय आहे. भुईमुगाची पेरणी खरीप हंगामात केली जाते कारण पावसाळ्यात त्याच्या पिकाची झपाट्याने वाढ होते, जरी काही भागात त्याची लागवड रब्बी हंगामात देखील केली जाते.

मोहरी लागवड

भुईमुगानंतर मोहरीचे नाव भारतातील प्रमुख तेलबिया पिकांमध्ये समाविष्ट आहे. बहुतेक घरांमध्ये याचा वापर केला जातो, त्यामुळे त्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बी हंगामात मोहरीची शेती केली जाते. अनेक शेतकरी मोहरीच्या लागवडीबरोबरच मध शेती करतात, ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांना हवे असल्यास मोहरी लागवडीबरोबरच तेल प्रक्रिया युनिट उभारून चांगला नफा मिळवता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe