Agriculture News : मित्रांनो शेतकऱ्यांचे तसेच पशुपालकाचे (Livestock Farmer) आणि पशुधनाचे वन्य प्राण्यांचा हल्ल्यामुळे अनेकदा नुकसान होत असते. वाघ किंवा बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांमुळे पशुधनाचे (LIVESTOCK) मोठे नुकसान होते.
अनेक प्रसंगी पशुपालक शेतकरी बांधवांचा देखील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडलेल्या असतील. मित्रांनो वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पालक शेतकरी बांधवांचा (farmer) जीव गेल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून कौतुकास्पद योजनादेखील (farmer scheme) चालवली जात आहे.
मयत झालेल्या पशुपालकांच्या कुटुंबाला यामुळे आर्थिक दिलासा मिळतो. मित्रांनो वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास पशुपालकाला मोबदला दिला जातो तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत केली जाते.
आता वण्यप्राण्यांचा हल्ल्यात नुकसान झाल्यास दिल्या जाणारी नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात आली आहे. याबाबत एक परिपत्रक देखील पशुसंवर्धन विभागाकडून जारी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या परिपत्रकाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीची हानी झाल्यास अशी दिली जाते मदत
मित्रांनो वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना वीस लाखांची मदत केली जाते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीला कायमचं अपंगत्व आलं तर त्याला पाच लाखांची मदत केली जाते. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीला सव्वा लाखांची मदत केली जाण्याचे प्रावधान यामध्ये आहे.
मित्रांनो, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीला वीस लाख रुपयांपैकी दहा लाख रुपये धनादेशच्या माध्यमातून तात्काळ दिले जातात तर उर्वरित दहा लाख रुपयापैकी पाच लाख त्या व्यक्तीच्या संयुक्त खात्यात दरमहा व्याज देणाऱ्या ठेव रक्कम मध्ये जमा केले जातात तर पाच लाख दहा वर्षा करता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जातात.
म्हणजेच दहा वर्षानंतर महेश झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला मदतीची पूर्ण रक्कम मिळते. मित्रांनो व्यक्ती जर किरकोळ जखमी झाला असेल तर औषधोपचारासाठी मदत केली जाते. तसेच औषधोपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता वीस हजार रुपये प्रति व्यक्ती अशी मदत दिली जाते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचे नुकसान झाल्यास अशी मदत दिली जाते
पाळीव प्राणी जसे की गाय म्हैस बैल मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या 75 टक्के किंवा 70 हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम मदत म्हणून दिली जात असते.
याशिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मेंढी, बकरी व इतर लहान पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या 75 टक्के किंवा 5 हजार यापैकी कमी असणारी रक्कम मदत म्हणून दिले जात असते.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या 50 टक्के किंवा 15 हजार मदत म्हणून दिले जातात.