Agriculture News : वातावरणातील बदल आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे मानवावर ज्या पद्धतीने विपरीत परिणाम होतं आहे त्याचं पद्धतीने याचा शेतीवर (Farming) देखील वाईट परिणाम होत आहे. एका अहवालानुसार, दरवर्षी शेतात कीटकांची संख्या वाढत असून यामुळे पिकांवर (Crops) येणाऱ्या रोगराईचे प्रमाण देखील वाढले आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधव त्याच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची (Pesticide) फवारणी करत आहेत. निश्चितच किटकांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी बांधव (Farmer) रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित प्रमाणापेक्षा जास्त वापर करत आहेत.

यामुळे माती आणि पिकांच्या आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होत असून कीटकनाशकांचा अधिक वापर केल्यामुळे तयार होणारा शेतमाल मानवाच्या आरोग्यासाठी देखील घातक ठरत आहे. अशा परिस्थितीत देशात सध्या सेंद्रिय शेतीला (Organic Farming) चालना दिले जात आहे.
शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करण्यासाठी मायबाप शासन देखील प्रोत्साहित करत आहे. यामुळे आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कीटकनाशकांची फवारणी न करता कशा पद्धतीने कीटकांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरं पाहता फवारणी न करता किडीचे नियंत्रण कसे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून किडींच्या समस्येवर शाश्वत उपाय करता येतो. यासाठी पिकांच्या मध्यभागी प्रकाश सापळा किंवा लाईट ट्रॅपचा (Light Trap For Pest Control) वापर केला जाऊ शकतो.
प्रकाश सापळा काम तरी नेमकं काय करतो
याला वैज्ञानिक भाषेत प्रकाश प्रपंच म्हणतात, जे कीटक आणि पतंगांसाठी जाळ्यासारखे किंवा सापळ्यासारखे काम करते. म्हणजे ज्या पद्धतीने उंदीर पकडण्यासाठी जाळ्यांचा वापर केला जातो तसेच कीटकांचा अटकाव करण्यासाठी या सापळ्यांचा वापर केला जातो.
वास्तविक प्रकाश सापळ्यामध्ये बल्ब असतो, जो वीज, बॅटरी किंवा सौरऊर्जेवर चालतो. शेतात प्रति एकर दराने अनेक प्रकाश सापळे लावले जातात, ज्यामध्ये रात्री बल्ब लावला जातो. बल्ब पेटवल्याबरोबर कीटक आणि पतंग प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होऊ लागतात आणि त्यावर आदळतात आणि बल्बच्या खाली कपमध्ये पडतात. या कपमध्ये सर्व कीटक मरतात आणि जमा होतात, जे सकाळी सापळ्यातून बाहेर काढले जातात.
प्रकाश सापळ्यांचा वापर तरी कसा केला जातो
कीड नियंत्रणासाठी लाइट ट्रॅप पिकापासून सुमारे 2 मीटर उंचीवर लावले जाते. या ट्रॅपचे दिवे रात्री 7 ते 10 च्या दरम्यान चालू केले जातात, त्यानंतर पेस्ट कंट्रोलचे काम आपोआप होतं राहते. शेतकरी हेक्टरी 2 ते 3 प्रकाश सापळे लावून फवारणी न करता कीड नियंत्रणाचे काम करू शकतात.
लाइट ट्रॅपचे फायदे तरी नेमके कोणते
भात, कापूस, कडधान्ये, मका, सोयाबीन आणि बागायती पिकांवरील किडींची दहशत रोखण्यासाठी प्रकाश सापळा म्हणजेच लाईट ट्रॅपचा वापर केला जातो. या यंत्राद्वारे लीफ रॅपर व्यतिरिक्त, स्टेम बोअरर, कट अळी, सुरवंट, फळ पोखरणारे, पानातील बोअरर कीटक इत्यादी पकडून नष्ट करता येतात.
कुठे खरेदी करायचे बर लाईट ट्रॅप
आज, इंटरनेटच्या युगात, प्रत्येक गोष्ट घरी बसून खरेदी करता येते, त्यामुळे शेतकरी त्यांना हवे असल्यास Amazon आणि अनेक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ते ऑर्डर करू शकतात. याव्यतिरिक्त शेतकरी बांधव कीटक नियंत्रणासाठी लाइट ट्रॅप बियाणे, कीटकनाशके आणि औषधांच्या दुकानातूनही खरेदी करू शकणार आहेत.