अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Ajay Patil
Published:

Agriculture News : भारत हा कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित. या शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा. हे बोलायला किती सुरेख वाटतं.

मात्र कृषीप्रधान देशात बळीराजा संकटात सापडला असून त्याच्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढावत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आत्महत्याची समोर येणारी आकडेवारी काळजाची धडधड वाढवणारी आहे.

आता तर कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव मतदारसंघात म्हणजेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात अवघ्या तीन दिवसात 2 शेतकरी राजांनी आपले जीवन संपवले आहे. खरं पाहता मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याच प्रमाण कायमच अधिक राहिले आहे.

मात्र आता मराठवाड्यातून राज्याला कृषी मंत्री लाभला असल्याने यावर कुठे ना कुठे अंकुश येईल, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील अशी आशा वाटत होती. परंतु परिस्थिती बदललेली दिसत नसून अजूनच बिघडत चालली आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणारी नापिकी ; हातात येणारे कवडीमोल उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढणारे कर्ज म्हणून सोयगाव मतदारसंघांमधील दोन तरुण शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे.

यामुळे शासनाचे शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र घडवण्याच ध्येय केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी बोलून दाखवण्यात आलं की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोयगाव मतदार संघातील दीपक जनार्दन सुस्ते वय वर्ष 32 आणि गोपाळ शेणफळ सोनवणे वय वर्ष 27 या दोन तरुणांनी कर्जबाजारीला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे.

जरंडी येथील दीपकने सततच्या नापिकीमुळे परेशान होऊन विष प्राशन करत आपले जीवन संपवले आहे. तर तीन दिवसांपूर्वी सोयगाव येथील गणेश यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आणि हाती अतिशय कवडी मूल उत्पन्न आल्यामुळे कर्ज कसा फेडायचं या विवचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठवाड्यातून एकूण पाच मंत्री सत्तेचा कारभार पाहत आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्याने राज्याला कृषिमंत्री दिला आहे. मात्र, पाच मंत्री असून देखील मराठवाड्यामधील शेतकरी आत्महत्याचा प्रश्न कायम असल्याने राजकारणी केवळ कारण करण्यासाठी शेतकऱ्यांचा उपयोग करतात असा आरोप आता बळीराजा लगावत आहे.

जगाच पोट भरणारा शेतकरी स्वतःचं पोट न भरू शकल्यामुळे फासावर लटकत असेल तर निश्चितच ही कृषीप्रधान देशासाठी काळीमा फासणारी घटना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe