Agriculture News : बातमी कामाची! पिकांच्या उत्पादनवाढीसाठी ‘या’ खताचा वापर करा, पैशांची बचत होणार आहे शिवाय उत्पादन देखील भरघोस मिळणार

Ajay Patil
Published:
Urea Shortage

Agriculture News : मित्रांनो भारतात सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात संपूर्ण देशभरात रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे.

मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात कडधान्ये तसेच तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. खरीप हंगामात देखील शेतकरी बांधव या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मित्रांनो या पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी शेतकरी बांधव वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतात.

अनेकदा शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या आशेपोटी खताचा अनिर्बंध वापर करतात, यामुळे उत्पादनात वाढ होण्याऐवजी जमिनीची सुपीकता कमी होत जाते आणि पिकावर देखील विपरीत परिणाम होतो. शेतकरी बांधव अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी युरिया आणि डीएपी सारख्या खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

हे खत (Chemical Fertilizer) किमतीने जास्त आहेत शिवाय याच्या जास्तीच्या वापरामुळे जमिनीवर विपरीत परिणाम होतो. हेच कारण आहे की कृषी तज्ञ शेतकरी बांधवांना (Farmer) खतांचा योग्य आणि संतुलित वापर करण्याचा सल्ला देत असतात. परंतु असे असले तरी सिंगल सुपर फॉस्फेट नामक एक असेही खत आहे जे युरिया आणि डीएपी पेक्षा स्वस्त आहे शिवाय याच्या वापरामुळे पिकांच्या वाढीस चांगली मदत होते. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना याचा वापर माती परीक्षणाच्या (Soil Testing) आधारे करण्याचा सल्ला जाणकार लोक देत असतात.

सिंगल सुपर फॉस्फेट

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सिंगल सुपर फॉस्फेट हे एक अतिशय किफायतशीर आणि फायदेशीर खत आहे, ज्यामध्ये सुमारे 16% फॉस्फरस आणि 11% सल्फर असते. कृषी तज्ज्ञांच्या मते, इतर खतांच्या तुलनेत कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी गंधक अत्यंत फायदेशीर आहे.

त्यामुळे तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढतेच. त्याचबरोबर कडधान्य पिकांमध्ये त्याचा वापर केल्याने प्रथिनांच्या प्रमाणातही सुधारणा दिसून आली आहे. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये असलेली पोषकतत्त्वे मातीची कमतरता दूर करतात आणि पिकांचे कोणतेही नुकसान न करता चांगले उत्पादन (Farmer Income) देतात. पिकांचे चांगले परिणाम मिळण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे सेंद्रिय खत, जैव खते आणि रासायनिक खतामध्ये मिसळून वापरावे.

शेतकऱ्यांचे पैसे वाचतील

मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगल सुपर फॉस्फेट केवळ युरिया-डीएपीपेक्षा स्वस्तचं आहे असे नाही तर पिकांच्या जोमदार वाढीसाठी खूप प्रभावी आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात कमालीची बचत होणार आहे. शिवाय या खताचा वापर केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळणार आहे.

एकंदरीत उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ होणार असल्याने या खताचा वापर शेतकऱ्यांचा नफा वाढवणार आहे. तरीही माती परीक्षण आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सिंगल सुपर फॉस्फेट किंवा इतर कोणतेही खत पिकासाठी वापरावे. माती परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर केल्यास खतांचा अनिर्बंध वापर कमी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe