शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु ; आता ‘या’ नावाने ओळखली जाणार ही योजना, अहमदनगर जिल्ह्याला मिळणार अधिक लाभ

Ajay Patil
Published:
agriculture scheme

Agriculture Scheme : मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना शासन स्तरावर कार्यान्वित केल्या जातात. अनेकदा शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजना वेगवेगळ्या कारणामुळे बंद देखील पडतात.

मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. मात्र, 2020 मध्ये सर्व जगात करुणा नामक महाभयंकर आजाराने थैमान माजवले असताना ही योजना बंद करण्यात आली होती.

कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाला असल्याने सदर योजना बंद झाल्याचे जाणकारांकडून सांगितले गेले होते. मात्र आता ही शेतकरी हिताची योजना पुन्हा एकदा नवीन रूपाने नवीन नावाने नवीन रंगाने शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. मित्रांनो मागील त्याला शेततळे योजना आता नव्याने सुरू झाली असून या योजनेचे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना असे नामकरण करण्यात आले आहे.

मित्रांनो एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार यावर्षी या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण 13,500 शेततळ्यांची निर्मिती करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किंचित वाढ देखील केली गेली आहे. पूर्वी 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत होते आता 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे आता आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो खरं पाहता मागेल त्याला शेततळे योजना ही दुष्काळी भागासाठी अतिशय फायद्याची होती. दुष्काळी भागात पाण्याची सोय करण्यासाठी शेततळे हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारा खर्च सर्व शेतकऱ्यांना पेलणारा नसतो. अशा परिस्थिती शासनाकडून वैयक्तिक शेततळे उभारण्यासाठी अनुदानाचे प्रावधान करण्यात आले आहे.

दरम्यान कोरोना काळात निधी कमी असल्याने सदर योजना बंद करण्यात आली होती. यामुळे शेततळे आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा ही योजना सुरू झाली असून त्यामुळे निश्चितच दुष्काळी भागात तसेच पाण्याची कमतरता असलेल्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मार्च 2022 मध्ये मागेल त्याला शेततळे योजना ही नवीन नाव देऊन सुरू करण्यात आली. मात्र त्यावेळी मार्गदर्शक सूचना जारी झालेल्या नव्हत्या. मात्र आता योजनेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देऊ करण्यात आल्या असून संबंधित प्राधिकरणाला आदेशित करण्यात आले आहे.

मित्रांनो मागेल त्याला शेततळे योजना आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या नावाने राबवली जाणार असून या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळे साठी शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण साडेतेरा हजार शेततळे बनवण्याचे टार्गेट शासनाने ठेवले असून यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1010 अनुसूचित जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 11,720 एवढी शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा मानस आहे. मित्रांनो या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

मित्रांनो वैयक्तिक शेततळ्याचे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 60 गुंठे जमीन असावी तसेच यापूर्वी शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दिव्यांग आणि महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महाराष्ट्रात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मिती अहमदनगर जिल्ह्यात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के यांनी याबाबत माहिती दिली आहे. निश्चितच यामुळे अहमदनगर जिल्ह्याला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून मोठी मदत मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe