अनंतरावांनी केले पेरू बागेचे भन्नाट नियोजन आणि वर्षाला मिळतात 5 ते 7 लाखांचे उत्पन्न! यातील एक ट्रिक वाढवते त्यांचे आर्थिक उत्पन्न

आंतरपीक पद्धत यशस्वी करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापन देखील तितकेच काटेकोर ठेवणे गरजेचे असते. आंतरपीक पद्धतीच्या मुद्द्याला धरून जर आपण परभणी जिल्ह्यात असलेल्या दैठणा या गावचे अनंतराव कच्छवे या प्रयोगशील शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर त्यांनी पेरू लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे

Ajay Patil
Published:
gauvha crop

Farmer Success Story:- उपलब्ध जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवणे ज्याला साध्य झाले अशा शेतकऱ्यांना शेती ही परवडते.तंत्रज्ञानाचा आवश्यक त्या ठिकाणी वापर आणि वेगवेगळ्या शेती पद्धतीचा केलेला अवलंब शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपये मिळवण्यासाठी फायद्याची ठरते.

बरेच शेतकरी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला दिसून येतात. ह्या पिकपद्धतीचा फायदा असा होतो की मुख्य पिकासाठी जो काही आपल्याला खर्च करावा लागतो तो खर्च अंतरपिकांमधून मिळालेल्या उत्पादनातून भरून निघण्यास मदत होते व त्यामुळे आंतरपीक पद्धत ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते.

परंतु आंतरपीक पद्धत यशस्वी करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापन देखील तितकेच काटेकोर ठेवणे गरजेचे असते. आंतरपीक पद्धतीच्या मुद्द्याला धरून जर आपण परभणी जिल्ह्यात असलेल्या दैठणा या गावचे अनंतराव कच्छवे या प्रयोगशील शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर त्यांनी पेरू लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे व याच पेरूमध्ये झेंडूचे आंतरपीक घेऊन अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी देखील त्यांना मदत झाली आहे.

अनंतराव पेरू बागेतून मिळवतात लाखोत उत्पन्न
परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावचे अल्पभूधारक शेतकरी अनंतराव कच्छवे यांच्याकडे पाच एकर शेतजमीन असून या जमिनीवर पारंपारिक पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षा पेरू लागवड करावी असे त्यांनी ठरवले. पारंपरिक शेतीला तिलांजली देत त्यांनी फळबाग लागवडीवर भर देण्याचा निश्चय केला व तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य नियोजन तसेच आंतरपीकांचा अवलंब करून पाच एकर क्षेत्रातून पेरू आणि झेंडूच्या आंतर पिकातून उल्लेखनीय असे आर्थिक उत्पन्न मिळवलेले आहे.

आजच्या परिस्थितीत शेतीवर येणारे अतिवृष्टी तसेच गारपीट किंवा वादळी वारे किंवा पावसाचा खंड इत्यादी संकटांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होते. इतक्या अडचणींमधून काही शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. परंतु योग्य वेळेला बाजारपेठेत चांगला दर मिळेल याची शाश्वती शेतकऱ्यांना नसते व बऱ्याचदा यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते.

या सगळ्या समस्येवर नामी उपाय म्हणून अनंतराव ज्ञानोबा कच्छवे यांनी पारंपारिक शेतीला सुट्टी देत फळबागेची कास धरली व योग्य नियोजन करून पेरूच्या बागेतून चांगले उत्पादन मिळवले आहे. त्यांनी पाच एकर क्षेत्रावर पेरू लागवड केली असून गेल्या तीन वर्षापासून त्यांना पेरूचे उत्पादन मिळत आहे.

यामध्ये ते दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत असून संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य त्यांना या शेतीमध्ये लागले आहे. मागील तीन वर्षापासून पेरूची थेट विक्री करत असल्यामुळे त्यांना बाजार भाव देखील चांगला मिळत आहे व या पाच एकर पेरू बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिके घेऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडताना दिसून येत आहे.

मागील तीन वर्षापासून पेरूला सरासरी प्रतिकिलो 50 रुपये किलो दर मिळत आहे व आंतर पिकांच्या माध्यमातून मिळालेले आर्थिक उत्पन्न असे मिळून दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न त्यामुळे त्यांना मिळत आहे.

विक्री व्यवस्थापनाची ही ट्रिक ठरत आहे फायद्याची
पेरूची विक्री करताना ते स्वतः विक्री करतात. म्हणजेच त्यांनी उत्पादक ते ग्राहक अशी एक साखळी निर्माण केली असून त्यामुळे त्यांना जास्तीचा दर मिळन्यास मदत होते.

अनंतराव यांची जमीन परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्यावरून जाणारे प्रवासी हेच त्यांचे ग्राहक आहेत. कारण अनंतराव या रस्त्याच्या कडेला पेरू विक्रीचे स्टॉल लावतात व स्वतः पेरूची विक्री करतात. या ट्रिक मुळे देखील पेरूपासून त्यांना जास्तीचा आर्थिक फायदा होताना दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe