Animal Care: पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक लहान सहान बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण माणसाचे किंवा गाय व म्हशींचे व इतर जनावरे यांच्या शरीराची रचना पाहिली तर ती काही दृष्टिकोनातून फायद्याची असते तर काही दृष्टिकोनातून त्याचे तोटे देखील असतात.
त्यामुळे या बाबीत संतुलन ठेवणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब प्राण्यांना असणाऱ्या शिंगांच्या बाबतीत देखील लागू होते. गाय-म्हशी व इतर प्राण्यांना शिंगे असतात. या शिंगांचे फायदे देखील आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. त्यामुळे या अनुषंगाने गाय-म्हशीचे शिंगे कापण्याची गरज नेमकी का आहे? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.
गाय व म्हशींचे शिंगे कापण्याची गरज नेमकी का असते?
गाय व म्हशी तसेच इतर प्राण्यांना शिंगे असतात. या शिंगांचा वापर बऱ्याचदा प्राणी त्यांचे रक्षण करण्यासाठी करतात. शिंगांचा फायदा आणि तोटा या बाजूने जर विचार केला तर फायदे खूप कमी आणि तोटे जास्त असल्याचे दिसून येते. प्राण्यांची शिंगे कापले जातात या प्रक्रियेला डीहॉर्निंग असे म्हटले जाते.
वासरांचा जन्म झाल्यानंतर साधारणपणे पाच ते दहा दिवसांच्या कालावधीत त्यांची शिंगे जाळली जातात व या शिंगे काढून टाकण्याला डिसबॉण्डिंग असे म्हणतात. जर आपण जनावरांना शिंगे असण्याचे फायदे पाहिले तर प्रामुख्याने बऱ्याचदा दोन जनावरांमध्ये संघर्ष उद्भवतो व शिंगे नसल्यामुळे एकमेकांना इजा होत नाही.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर प्राण्यांनी हल्ला केला आणि त्यांना शिंगे नसले तरी व्यक्तीला कुठल्याही प्रकारची इजा त्यांच्याकडून होऊ शकत नाही. तसेच गोठ्यामध्ये आवश्यक असलेल्या अनेक भांड्यांची देखील शिंगांमुळे जनावरे तोडफोड करतात. परंतु शिंगे नसल्यावर असले प्रकार दिसून येत नाही. हे साधारणपणे शिंगे नसल्याचे फायदे आहेत.
शिंगांमुळे जनावरांना होऊ शकतो कॅन्सर
शिंगांचा प्रमुख तोटा म्हणजे जनावरांना अनेक प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव यामुळे होण्याची शक्यता असते. परंतु या माध्यमातून होणारे रोग अनेकदा आपोआप बरे होतात. परंतु शिंगांचा कॅन्सर म्हणजेच कर्करोग झाला तर जनावरांच्या जीवावर बेतू शकते. जगाचा विचार केला तर जनावरांना होणारा शिंगांचा कॅन्सर हा सुमात्रा तसेच ब्राझील व आशिया इत्यादी ठिकाणी दिसून येतो. या प्रकारच्या कॅन्सरमध्ये शिंगांच्या काही पेशी अचानक वाढतात व शिंग खूप नरम होते व खाली लटकते.
शिंगांमध्ये वेदना होत असल्यामुळे जनावरे डोके एका बाजूला झुकवते. तसेच जनावरे डोके हलवतात तसेच भिंतीला शिंग घासतात व यामुळे बऱ्याचदा शिंग तुटते.शिंग तुटल्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे काही मांस असते ते सडायला सुरुवात होते व योग्य काळजी घेतली गेली नाही तर यामध्ये किडे देखील पडण्याची दाट शक्यता असते. अशा पद्धतीने शिंगे असल्याचे फायद्यापेक्षा तोटे जास्त दिसून येतात.