Animal Husbandry : गीर गाय शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान; गीर गायीचे संगोपन मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न

Ahmednagarlive24 office
Published:

Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जातो. पशुपालनात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जाते.

पशुपालन मुख्यतः दूध उत्पादनासाठी पशुपालक शेतकरी बांधव करत असतात. पशुपालन व्यवसायातुन शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ नफा देखील मिळत आहे. आपल्या राज्यात (Maharashtra Farmer) मोठ्या प्रमाणात गाईंचे पालन पशुपालक शेतकरी (Livestock Farmer) करीत आहेत.

गाई पालनात सर्वाधिक गीर जातीच्या (Gir Cow Rearing) गाईंचे पालन शेतकरी बांधवांना अधिक फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला जातो. मित्रांनो गीर गाईच्या दुधाला (Gir Cow Milk) तसेच गीर गाईच्या दुधापासून निर्मिती उत्पादनाला बाजारात मोठी मागणी असते शिवाय त्याला दर देखील इतर गाईंच्या उत्पादनापेक्षा अधिक मिळतो.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, गीर गाईपासून (Gir Cow) A2 प्रकारचे दुध मिळत असते हे दुध आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याने याला बारामाही मागणी असते. गीर गायीचे दूध इतर गाईच्या दुधाच्या तुलनेत दुपटीने महाग विकले जाते शिवाय या पासून बनवलेल्या तुपाला देखील बाजारपेठेत मोठी मागणी असते आणि त्याला देखील उच्चांकी दर मिळत असतो.

गीर गायीचे दूध आणि तूप इतर गाईंच्या तुलनेत महाग जरी विकले जात असले तरी देखील यामध्ये असलेले औषधी गुणधर्म बघता याची बाजारात कायमच मोठी मागणी असते. यामुळे निश्चितच गीर गायीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

मित्रांनो बाजारात गीर गाईची किंमत हे जवळपास 60 ते 70 हजाराच्या दरम्यान असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात.

गीर गाय पालन कां ठरू शकते फायदेशीर
पशुपालन व्यवसायातील जाणकार लोकांच्या मते, गिर गाई एका सीजनमध्ये सुमारे 300 दिवस दुध देत असतात. 300 दिवसात गीर गाय साधारणपणे दोन हजार लिटरहुन अधिक दूध देत असते.

वेताच्या सुरवातीच्या काळात गिर गाय दिवसाला आठ लिटर पर्यंत देण्यास सक्षम असते. मात्र वेताच्या मध्यंतरी गिर गाय दिवसाला पंधरा लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम बनत असते. अशा पद्धतीने एका सीझनमध्ये गिर गाय दोन हजार लिटरहुन अधिक दूध देत असल्याचा दावा पशुपालन व्यवसायातील जाणकार लोक करत असतात.

यामुळे गाईंचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांना गीर गायीचे संगोपन अधिक फायद्याचे ठरू शकते. गीर गायीचे संगोपन करून पशुपालक शेतकरी दुग्ध उत्पादनातून चांगली मोठी कमाई करू शकतात. यामुळे निश्चितच पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार असल्याचा दावा केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe