तरुणाई म्हटले म्हणजे अंगामध्ये कायम सळसळणारा उत्साह, काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करण्याची इच्छाशक्ती व ती पूर्ण करण्याकरिता लागणारे धैर्य आणि आणि कुठल्याही प्रकारचे कष्ट उपसण्याची मानसिक तयारी देखील तरुणांमध्ये असते. तरुणांसोबत आता तरुणी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांसोबत यश संपादन करताना आपल्याला दिसून येतात.
अगदी देशाचे संरक्षण क्षेत्र असो किंवा हवाई वाहतूक क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र यामध्ये महिला देखील आता पुरुषांच्या बरोबरीने यश मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीची यशोगाथा पाहिली तर ती थक्क करणारी आहे.
अनुष्काने केली शेती व्यवसायाची निवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या लखनऊ या ठिकाणाची अनुष्का जयस्वाल हिने शिक्षण घेतल्यानंतर शेतीचा मार्ग निवडला व वयाच्या 23 व्या वर्षी शेती व्यवसाय करायला सुरुवात केली व तिचे वय आता 27 वर्षे आहे.
परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुष्का शेती व्यवसायातून प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये पेक्षा जास्त कमाई करते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 20 पेक्षा जास्त लोकांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच वार्षिक 45 लाख रुपयेपेक्षा जास्त नफा ती शेतीच्या माध्यमातून कमावत आहे.
भाडेपट्ट्याने जमीन घेऊन केली शेतीला सुरुवात
2021 मध्ये अनुष्काने लखनऊच्या सीसेंडी गावामध्ये एक एकर जमीन भाड्याने घेतली होती व शेती व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा तिचे वय साधारणपणे तेवीस वर्षे होते. या अंतर्गतच तिने दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. परंतु शिक्षणाला अनुरूप काम करण्याची इच्छा नसल्यामुळे तिने वेगळे करण्याचे ठरवलेले होते
व शेती करायचा निर्णय घेतला. शेती करायला सुरुवात केल्यानंतर सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळते म्हणून एक एकरवर पॉलिहाऊस उभारून शेतीला सुरुवात केली व आता ती आणखी सहा एकर शेती भाडेपट्ट्याने करत आहे. या सगळ्या शेतीमध्ये ती भाजीपाला पिके घेते. यामध्ये प्रामुख्याने शिमला मिरची तसेच कोबी, फ्लावर आणि इतर अनेक भाजीपाला पिकांचे उत्पादन ती घेते व यातून भरपूर नफा मिळवत आहे.
जेव्हा अनुष्काने शेती करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा तिला बऱ्याच जणांनी सांगितले की शेतीमध्ये नफा होणार नाही हा एक तोट्याचा व्यवसाय आहे. एवढेच नाही तर तू मुलगी असून शेती कशी करशील? इत्यादी प्रश्न लोकांनी उपस्थित केले. परंतु अनुष्कानी या सगळ्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःचा निवडलेल्या मार्गावर ती चालत राहिली
व चारच वर्षांमध्ये तिला तिच्या कष्टाचे फळ मिळाले. आज तिला वर्षाला 45 लाखापेक्षा जास्त नफा मिळत असल्याचे देखील तिने सांगितले. अनुष्काच्या शेतामध्ये पिकणारा भाजीपाला हा लखनऊच्या सर्व मार्केट आणि मोठे शॉपिंग मॉलमध्ये विकला जातो व त्यामुळे साहजिकच मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होत आहे.
विशेष म्हणजे अनुष्का जयस्वाल ही तरुणी उच्चशिक्षित कुटुंबातून असून तिचे वडील उत्तम बिझनेस मॅन आहेत व आई गृहिणी तर भाऊ पायलट व बहीण वकील आहे.
अनुष्का जयस्वाल यांच्या वहिनी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की अनुष्काची कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि शेतीचा कसलाही संबंध नाही. परंतु तरीदेखील एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन तिने शेती करायचा निर्णय घेतला व प्रशिक्षण घेऊन शेती व्यवसायातील उतरली.
सेंद्रिय पद्धतीने करते भाजीपाला लागवड
अनुष्का शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर भर देते. सध्या ती एका एकर मध्ये इंग्रजी काकडीचे 50 टन तर लाल पिवळ्या मिरचीचे 35 टन उत्पादन घेते.
अनुष्काच्या शेतामध्ये पिकणारा भाजीपाला लखनऊच्या सर्व बाजारपेठांमध्ये विकला जातो व मोठे शॉपिंग मॉलमध्ये देखील त्याची विक्री होते. विशेष म्हणजे अनुष्का संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे व साहजिकच सेंद्रिय भाजीपाला असल्यामुळे मागणी जास्त आहे.
अशा पद्धतीने अनुष्का वरून दिसून येते की आपल्याला एखाद्या क्षेत्राचा अनुभव जरी नसला तरी आपण त्यातून हीमतीने उतरून आणि प्रशिक्षण घेऊन जर सुरुवात केली तर व्यक्ती यशस्वी होऊ शकते.