Farmer succes story : शेती (Farming) आणि शेतीशी संबंधित शेती पुरक व्यवसायात (Agri Business) असंख्य शक्यता असून यामध्ये मोठी कमाई करण्याचे अनेकानेक चान्सेस आहेत.
या शक्यतांचा शोध घेण्यासाठी आणि आपले उत्पन्न वाढावे यासाठी, विविध व्यवसायातील लोक आता शेती व शेतीपूरक व्यवसायात (Animal Husbandry) आपले नशीब आजमावत आहेत. फक्त नशीब आजमावत आहेत असे नाही तर अनेक लोक कठोर परिश्रम आणि समर्पणाने यश देखील मिळवत आहेत.
विशेष म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाने आजच्या काळात तरुणाईही शेतीशी संबंधित व्यवसायाकडे आशेने बघत असून याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. आता शेती मधला तरुणाई वर्ग पारंपारिक पद्धतींपेक्षा काहीतरी जरा हटके करत आहे आणि इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनत आहे.
अशीच एक व्यक्ती आहे नरेंद्र कुमार. मित्रांनो खरं पाहता नरेंद्र व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत मात्र ते पशुपालन व्यवसाय करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. नरेंद्र हे मूळचे बिहार (Bihar) येथील रहिवासी आहेत, परंतु गेल्या काही वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास असून दुग्धव्यवसाय करत आहेत.
विशेष म्हणजे जनावरांसाठी ते चारा विकत घेत नाहीत तर स्वतः चाऱ्याचे उत्पादन घेतात. चाऱ्याचे उत्पादन देखील ते हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने घेत आहेत. एवढेच नाही नरेंद्र देशी गायींच्या संवर्धनावरही काम करत आहेत.
सीए नरेंद्र कुमार हे मूळचे बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रुनी-सैदपूर तहसीलचे रहिवाशी आहेत आणि सध्या नोएडामध्ये वास्तव्यास असून त्यांची कंपनी चालवत आहेत. मित्रानो नरेंद्र CA चे यशस्वी व्यावसायिक जीवन जगत होते.
मात्र कोरोनाच्या काळात नरेंद्र कुमार यांना शुद्ध देसी तूप आणि दूध मिळतं नव्हते. यामुळे त्याच्या मनात विचार आला की आपण स्वतःच काही तरी करावे म्हणजे देशी तूप आणि दुधासाठी भटकंती करावी लागणार नाही.
या विचाराने त्यांनी स्वतःसाठी देशी गाय संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने त्यांनी पशुपालन सुरु केले आणि लवकरच त्यांच्या फार्ममध्ये गायींची संख्या वाढत गेली. आज नरेंद्रकडे गीर आणि साहिवाल जातीच्या अनेक गायी आहेत.
देशी गायींच्या संवर्धनासाठी पण काम सुरु
उत्पादन वाढल्यावर ते दूध, तूप, दही विकू लागले. देशी गायींच्या उत्पादनांना शहरापासून ते तळागाळात असलेल्या खेड्यापाड्यांवर मोठी मागणी आहे आणि लोक त्यासाठी चांगली किंमतही देतात. नरेंद्र आज नोएडा-एनसीआरच्या अनेक भागात दूध, दही आणि तूप विकत आहेत.
अलीकडे देशी गायींची संख्या कमी झाली आहे. अधिक दूध मिळावे या इच्छेने पशुपालक आता जर्सी आणि इतर गायींचे पालनपोषण करत आहेत. पण गुरेढोरे मालकांनी देशी गायींकडे वळावे अशी नरेंद्रची इच्छा आहे, म्हणूनच नरेंद्र देखील देशी गाईंचे संगोपन करणार आहेत.
नरेंद्र म्हणतात की, देशी गाय कमी दूध देते, पण दुध हे गुणवत्तापूर्ण असते. गुणवत्तेला धक्का न लावता देशी गायींची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ते प्रोत्साहन कार्यही करत आहेत. यासोबतच देशी जातीचे चांगले नंदीही तयार केले जात आहेत.
शुद्ध आणि देशी गाईचे दूध आणि त्याची उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे नरेंद्र सांगतात. निश्चितच नरेंद्र यांनी शेतीपूरक व्यवसायात साधलेली प्रगती उल्लेखनीय असून इतरांसाठी मार्गदर्शक आहे.