Ativrushti Nuksan Bharpai : राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची झळ सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Crops) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या हातून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. अकोल्यात देखील जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या बदल्यात नुकसान भरपाई (Compensation) देण्यास सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola Farmer) अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून (Government) 140 कोटी 50 लाख 83 हजार रुपयांची नुकसान भरपाई अनुदान (Subsidy) स्वरूपात देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की,जिल्ह्यातील 61 हजार 634 शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत नुकसान भरपाईची मदत देऊ करण्यात आली आहे. या एवढ्या शेतकऱ्यांना जवळपास 64 कोटी चाळीस लाख 19 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित मदत देखील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच दिली जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकरी बांधवांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. सदर निधी शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिला जावा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अतिवृष्टीच्या मदतीचा निधी मिळालेला नाही अशा शेतकरी बांधवांना लवकरच अतिवृष्टीची मदत मिळणार असल्याचे चित्र समोर येत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी दिली जावी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी अरोरा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आणि जिल्ह्यातील जवळपास सर्व तहसीलदार हजर होते. या नुकसान भरपाई बाबत अधिक माहिती देताना सांगितले गेले की, जिल्ह्यातील जवळपास 98 हजार 321 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील एक लाख 20 हजार 239 शेतकऱ्यांना फटका बसला असून यात शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत दिली जात आहे. निश्चितच यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. आतापर्यंत 64 कोटी 40 लाख 19 हजार रुपयांची मदत वर्ग झाली असून उर्वरित मदत देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे साहजिकच राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 140 कोटी ; वाचा खरी माहिती
Ajay Patil
Published: