Broccoli Farming : 75 दिवसात 15 लाखांची कमाई! ब्रॉकोली ‘या’ विदेशी भाजीपाल्याची अशा पद्धतीने शेती करा, लाखोत खेळणार

broccoli farming

Broccoli Farming : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जात आहे. या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या तरकारी म्हणजेचं भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात करत आहेत.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीतून चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) देखील होत आहे. मित्रांनो आता शेतकरी बांधवांनी फक्त स्वदेशीचं नाही तर विदेशी भाजीपाल्यांची देखील लागवड सुरू केली आहे. ब्रोकोली (Broccoli Crop) हे देखील असच एक विदेशी भाजीपाला पीक आहे.

या पिकाची आता आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ब्रोकोलीला बाजारात मोठी मागणी देखील आहे. शिवाय बाजारात या भाजीपाला पिकाला चांगला बाजार भाव देखील मिळत असतो. ब्रॉकोली या भाजीपाला पिकामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळत असल्याने जे सेवन मानवी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

अशा परिस्थितीत या भाजीपाला पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत आज आपण ब्रॉकोली या भाजीपाला पिकाच्या शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो ब्रोकोली हे अगदी फुलकोबी सारखे दिसते. मात्र याचा रंग हिरवा असतो. त्याला आपल्या भारतात हिरवी फुलकोबी म्हणून देखील ओळखली जाते. मित्रांनो जाणकार लोक सांगतात की हे पीक अवघ्या 75 दिवसात काढण्यासाठी तयार होत असते. म्हणजे शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड केल्यास त्यांना अवघ्या अडीच महिन्यात चांगली कमाई होणार आहे.

ब्रोकोली शेतीमधील काही महत्वाच्या बाबी 

ब्रोकोली हे मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असून याला पोषक तत्वांची खाण म्हणतात. ब्रोकोलीच्या लागवडीसाठी थंड हवामान किंवा सामान्य हवामान सर्वात योग्य असल्याचे कृषी तज्ञ नमूद करतात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारतातील हवामान ब्रोकोली शेतीसाठी अतिशय योग्य आहे. आपल्या देशातील हवामानानुसार ब्रोकोलीची रोपवाटिका सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तयार करायला पाहिजे असा जाणकारांचा सल्ला आहे.

याच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी वालुकामय चिकणमाती सर्वोत्तम असते. या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्या शेतीजमिनीचे पीएम मूल्य 6 ते 6.5 दरम्यान असते अशी शेतजमीन याच्या शेतीसाठी सर्वोत्कृष्ट असते. ब्रोकोलीच्या लागवडीतुन चांगले उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक राहील असल्यास या पिकांचे चांगल्या प्रतीचे उत्पादन घेता येते. याच्या पिकासाठी गांडूळ खताचाही वापर करता येतो.

ब्रोकोली शेतीतुन मिळणार उत्पन्न

शेतकरी बांधवांनी जर समजा एक हेक्टर शेतात ब्रोकोली लागवड केली तर त्यांना 12 ते 14 टन उत्पादन मिळू शकते.  त्याचे पीक काढणीसाठी 60 ते 65 दिवसांत तयार होते. बाजारात एक किलो ब्रोकोलीची किंमत 50 ते 150 रुपये असते. अशा प्रकारे शेतकरी ब्रोकोलीची व्यावसायिक शेती करून लाखोंची कमाई करू शकतात. जर समजा शेतकरी बांधवांनी एक हेक्‍टर क्षेत्रातून तेरा टन काकडीचे उत्पादन घेतले तर त्यांना 120 रुपये प्रतिकिलो या दराने देखील बाजारभाव मिळाला तरी देखील त्यांना 15 लाखांपर्यंत कमाई होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe