Business Idea: देशातील शेतकरी (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. राज्यात देखील आता शेतीचे (Agriculture) चित्र अक्षरशः पालटल असून आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ नफा (Farmer Income) शेतीतून मिळत आहे. शेतकरी बांधव आता नगदी तसेच औषधी वनस्पतींची (Medicinal Plant Farming) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका औषधी वनस्पतीच्या शेतीविषयक काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण एरंड या औषधी पिकाच्या शेतीविषयी (Castor Farming) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यात एरंडाचे बिया येतात. ज्यामध्ये 60 टक्क्यांपर्यंत तेल आढळते. हे तेल वार्निश, कापड रंगविणे आणि साबण इत्यादींमध्ये वापरले जाते. पोटदुखी, पचन, लहान मुलांची मसाज इत्यादींवर आयुर्वेदिक औषध म्हणून याचे तेल वापरले जाते. त्याचबरोबर तेल काढल्यानंतर मिळणारा केक शेतकरी सेंद्रिय खत म्हणून वापरतात. विशेष म्हणजे त्याचे तेल शून्य तापमानातही गोठत नाही.
एरंड लागवडीसाठी आवश्यक तापमान
एरंड उत्पादनात चीन आणि ब्राझीलनंतर भारत हा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जाणकार लोकांच्या मते, याच्या लागवडीसाठी कमी सुपीक जमीन आवश्यक असते. याच्या शेतीसाठी पाण्याच्या योग्य निचरा होणारी जमीन हवी शिवाय जमिनीचे pH मूल्य 6 च्या आसपास असावे. त्याची झाडे दमट आणि कोरड्या हवामानात चांगली वाढतात. ही वनस्पती सामान्य तापमानात वाढणारी आहे. सामान्य तापमानात वनस्पती झपाट्याने विकसित होते. या झाडाची पाने खूप मोठी असतात. पिकाच्या पिकण्याच्या वेळी त्याच्या रोपाला तीव्र तापमानाची आवश्यकता असते.
चांगला भाव मिळतो
मित्रांनो केस गळणे थांबवण्यासाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरत आहे. ते लावल्याने केस चमकदार होतात. त्याचे तेल आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते. भारतातील अनेक भागात एरंडाची लागवड केली जाते. भारत हा एक देश आहे जो परदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादित एरंडेल तेल निर्यात करतो. एरंडीचे बाजारभाव वेगवेगळ्या मंडईत वेगवेगळे असतात. मात्र 54शे ते 72शेपर्यंत बाजारभाव मिळतो.
जून आणि जुलैमध्ये लागवड करावी
एरंडीच्या बिया ड्रिल पद्धतीने पेरल्या जातात. ही प्रक्रिया मशीन किंवा हाताने केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे 20 किलो बियाणे वापरले जाते. बियाणे पेरणीसाठी सर्वोत्तम वेळ जून आणि जुलै मानली जाते. रोप उगवल्यानंतर सुमारे 20 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार सिंचन केले जाते. त्याच्या झाडांना आवश्यकतेनुसारच पाणी द्यावे. वेळेवर देखभाल केल्यास चांगले पीक येते. एरंड बियाणे किंवा तेल विकून शेतकरी लाखोंचा नफा कमावत आहेत.