Business Idea: देशातील शेतकरी बांधव (Farmer) फार पूर्वीपासून भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) करत आले आहेत. फुलकोबी देखील असेच एक भाजीपाला वर्गीय पिक आहे. फुलकोबी ही जवळपास सगळ्यांनाच आवडते. आपल्या देशात फुलकोबीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.
खरं पाहता हिवाळ्यात फुलकोबी बाजारात सहज मिळते, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कोल्ड स्टोअरेजमध्ये असलेली फुलकोबी मिळते, तीही खूपच महागात विकली जाते. यामुळे फुलकोबी लागवड (Cauliflower Farming) शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरणार आहे. शेतकरी बांधव सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात (Kharif Season) हवे असल्यास लवकर लावल्या जाणाऱ्या फुलकोबीच्या जातीची (Cauliflower Variety) लागवड करू शकतो.
अर्ली फ्लॉवर म्हणजेच फुलकोबीची लवकर लागवड करता येणारी जात असते. आगात लावता येणाऱ्या जाती हिवाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या मध्यभागी लावल्या जातात. फुलकोबीच्या लागवडीसाठी 25-30 हजार रुपये गुंतवनुक करावी लागते आणि यातून सुमारे 2-2.5 लाख रुपये शेतकरी बांधव सहजरीत्या कमवू शकतात.
फुलकोबीची आगात किंवा लवकर लागवड कधी केली जाते
फुलकोबीची आगात लागवड जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते. जर आपण त्याची लागवड आत्तापासून सुरू केली, तर हिवाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पीक तयार होईल. हे पीक पावसाळ्यात घेतले जाते, त्यामुळे शेतात (Farming) पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोबी लागवडीपूर्वी शेताची चांगली नांगरणी करावी व शेणखतही टाकावे. लक्षात ठेवा, फुलकोबीची लागवड अतिशय नाजूक असते, यामुळे याच्या शेतीत पूर्ण काळजी न घेतल्यास छोट्याशा चुकीनेही मोठे नुकसान होऊ शकते.
आगात फुलकोबी लागवडीसाठी किती येतो खर्च
फुलकोबी हिवाळ्यात घेतली जाते, मात्र हिवाळ्यात आवक अधिक असते यामुळे भावात घसरण होते. यामुळे फुलकोबीची जर आगात लागवड केली तर तुमची फुलकोबी हिवाळ्याच्या हंगामापूर्वी तयार होते, आणि फुलकोबी चांगल्या किमतीत विकली जाते. आगात फुलकोबी लागवड करताना फुलकोबीच्या सुधारित वाणांची निवड करावी असा सल्ला दिला जातो. फुलकोबीच्या सुधारित जातीचे बियाणे सुमारे 100 ग्रॅम 15-20 हजार रुपयांना मिळते, जे एक एकरसाठी पुरेसे असेल.
याशिवाय लावणी, तण काढणे, कीटकनाशके, खते इत्यादीसाठी मजुरीवर खर्च करावा लागेल. या सगळ्यावर 25-30 हजार रुपये खर्च होऊ शकतो. म्हणजेच एकंदरीत तुमचा खर्च सुमारे 50 हजार रुपये प्रति एकर येऊ शकतो. तथापि, शेत आपले असावे, अन्यथा शेत देखील करारावर घ्यावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला एका पिकासाठी म्हणजे 6 महिन्यांसाठी प्रति एकर 25-30 हजार रुपये खर्च करावे लागतील.
आगात फुलकोबी लागवड केली तर होणार लाखोंचा फायदा
आगात फुलकोबीची लागवड केल्यास एकरी सुमारे 100 क्विंटल उत्पादन मिळते. हिवाळा सुरु होण्यापूर्वी कोबीची किंमत खूप जास्त असते. किरकोळ बाजारात ते 30 ते 40 रुपये किलोपर्यंत विकले जाते. अशा परिस्थितीत मंडईत तुमची कोबी 20-25 रुपये किलोने सहज विकली जाईल. म्हणजेच, एक एकर आगात फुलकोबीच्या लागवडीपासून तुम्हाला 2-2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल. यातील 50 हजार रुपये शेतीवरील खर्च जरी काढला तरी तुम्हाला 2 लाख रुपये निव्वळ नफा मिळेल.
अशा पद्धतीने होणार एकरी चार लाखांची कमाई
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुम्ही तुमचे पीक थेट बाजारात नेऊ नका, बाजारात विक्री करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्व लहान दुकानांशी संपर्क साधून त्यांना पीक पुरवठा केला तर तुमचा 2 लाखांचा नफा 4 रुपयांपर्यंत होऊ शकतो.