Business Idea: मित्रांनो जगभरात कॉफीचा (Coffee) वापर वाढत आहे. आपल्या देशात देखील चहा पाठोपाठ कॉफीची देखील मोठी मागणी आहे. अलीकडे मोठ्या शहरांमध्ये लोक चहाऐवजी कॉफी पिणे पसंत करायला लागले आहेत.
अनेक सौंदर्य उत्पादने आणि खाद्यपदार्थ देखील कॉफीवर प्रक्रिया (Cofee Processing) करून बनवले जातात. त्यामुळेच भाज्या आणि फळांप्रमाणेच बाजारात कॉफीची मागणीही वाढत आहे. कॉफीची जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी भारताव्यतिरिक्त 6 देश त्याची लागवड करतात, त्यामुळे शेतकरी सुरुवातीपासूनच कॉफीची लागवड (Coffee Farming) करून मोठा नफा कमवू शकतात.
या राज्यांमध्ये कॉफीची लागवड
कॉफीचे दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्य हवामान आणि जमिनीत त्याची लागवड करावी. तज्ज्ञांच्या मते, समशीतोष्ण जमिनीत याची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ही भारतातील एकमेव राज्ये आहेत जिथे अनेक शेतकरी (Farmer) वर्षानुवर्षे कॉफीची लागवड (Farming) करत आहेत. मात्र असे असले तरी महाराष्ट्रातील चिखलदरा व आजूबाजूच्या परिसरात कॉफीचे मळे नजरेस पडतात.
मात्र महाराष्ट्रात कॉफी लागवड बोटावर मोजण्याइतकीच आहे, आपल्या राज्यातील हवामान कॉफी लागवडीसाठी अनुकूल नाही. मात्र चिखलदरा सारख्या भागात कॉफीची लागवड करता येऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कॉफीची एकदा पेरणी आणि पुनर्लावणी केल्यानंतर, त्याच्या बियांचे बंपर उत्पादन सुमारे 50-60 वर्षे घेतले जाऊ शकते.
कॉफी फार्मिंग मध्ये खबरदारी
>खुल्या आणि कडक सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी कॉफीची लागवड टाळावी. केवळ सावलीच्या ठिकाणी चांगले उत्पादन मिळू शकते.
>त्याच्या लागवडीला जास्त सिंचनाची आवश्यकता नसते. फक्त पिकाला खत घालून उत्तम दर्जाची कॉफी तयार होते.
>त्याच्या पेरणीसाठी जून ते जुलै हा सर्वोत्तम काळ आहे.
>डोंगराळ भागात लागवडीसाठी बियाण्यांऐवजी कलम पद्धतीने पेरणी करावी.
>मैदानी भागात, चिकणमाती जमिनीतील सेंद्रिय पदार्थ पुन्हा भरून चांगले उत्पादन मिळवू शकतात.
>केरळ हे भारतातील सर्वात मोठे कॉफी उत्पादक राज्य असल्याचे म्हटले जाते, जिथे अरेबिका कॉफीची जात लावली जाते.
>कॉफी पिकामध्ये कीटक आणि रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही, परंतु तरीही, तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचे द्रावण बनवू शकता किंवा सेंद्रिय कीटकनाशके (निम कीटकनाशक) फवारू शकता.
>पिकात खुरपणी, निंदणी केल्याने ऑक्सिजनचे परिसंचरण झाडांमध्ये राहते आणि वाढ जलद होते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढणार?
>कॉफीच्या लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, त्याचप्रमाणे इतर पिके किंवा सह-पिके घेऊन ते दुप्पट उत्पन्न मिळवू शकतात.
>एकदा लागवड केल्यावर, कॉफीचे रोप 4-5 वर्षांत बियाण्यास तयार होते.
>त्यानंतर सुमारे 50-60 वर्षे कॉफीच्या बागांमधून बंपर उत्पादन घेता येते.
>एका अंदाजानुसार, एक एकर जमिनीतून सुमारे अडीच ते तीन क्विंटल कॉफीचे बियाणे तयार होऊ शकते.
>त्याची व्यावसायिक लागवड करून शेतकरी वार्षिक किमान 80,000 रुपये कमवू शकतात.
>शेतकऱ्यांना हवे असल्यास ते कॉफीसोबतच कडधान्ये आणि तेलबिया पिके घेऊ शकतात.
>असे केल्याने जमिनीची सुपीकता वाढेल आणि शेतकऱ्यांना कमी खत आणि पाण्यावर खर्च करून चांगले उत्पन्न मिळेल.