Business Idea: देशात मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) सुरू असून खरीप हंगाम प्रगतिपथावर आहे. देशातील शेतकरी बांधवांनी (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी करायला सुरवात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांची पेरणी आटोपली देखील आहे.
मात्र असे असले तरी अजूनही शेतकरी कमी खर्चात काही पिकांची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात. या हंगामात या पिकांची शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. खरं पाहता पावसाळ्यात पारंपरिक पिकांसोबतच अनेक प्रकारची नगदी पिके (Cash Crop) लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा (Farmer Income) कमवू शकतात.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पावसाळ्यात अशी अनेक फळझाडे आहेत ज्यांची लागवड केली जाऊ शकते. यात प्रामुख्याने डाळिंब, पेरू, करवंद, लिची, फणस, द्राक्षे, लिंबू ही फळझाडे लावता येतात. आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी काही ठराविक पिकांच्या शेतीबद्दल (Farming) माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण पावसाळ्यात लावता येणाऱ्या पिकांची माहिती घेऊया. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कमळ काकडी:- मित्रांनो कमळाच्या फुलाबद्दल तुम्हाला माहिती असेलच. कमळाची फुले बाजारपेठेत चांगल्या भावात विकली जातात. मात्र या वनस्पतीच्या देठाला देखील कायम मागणी असते. अशा परिस्थितीत कमाल शेतीतून चांगला नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कमळाच्या देठास कमळ काकडी म्हणतात.
आपल्या देशात कमळ देठाची भाजी तयार करून खाल्ली जाते, त्याचप्रमाणे त्याचे लोणचेही बनवले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. वर्षातून तीनदा याची लागवड करता येते. म्हणजेच हे बारामाही येणारे पीक आहे. याची पावसाळ्यात देखील लागवड करता येणे शक्य आहे.
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, कमळ काकडीला चांगले विकसित होण्यासाठी जास्त पाणी लागते. शेतकरी बांधवांना याची शेती करायची असेल तर शेतकरी त्यांच्या शेतात तलाव बनवून त्याचे बियाणे पेरू शकतात. कमळ काकडीच्या उत्पादनाबद्दल सांगायचे तर, एका एकरात सुमारे 50-60 क्विंटल कमळ काकडीचे उत्पादन घेणे सहज शक्य असल्याचा दावा केला जातो.
मशरूम:- पावसाळ्यात तुम्ही छत्रीच्या आकाराची झाडे पाहिली असतील, ज्याला मुलं सापाची छत्री किंवा कुत्र्याची छत्री असेही म्हणतात. या पिकाला मशरूम म्हणतात. खरं पाहता याच्या अनेक प्रजाती विषारी असतात. मशरूमच्या विषारी प्रजाती खाण्यायोग्य नसतात. मात्र मशरूमच्या काही प्रजाती खाण्यासाठी वापरल्या जातात. बाजारपेठेत या खाण्यायोग्य मशरूमला मोठी मागणी असते. ज्यामध्ये बटन मशरूम, दुधाळ मशरूम इ. मशरूमचा समावेश होतो.
कृषी तज्ञांच्या मते, खाण्यायोग्य मशरूमची लागवड करून शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. खरं पाहता पावसाळ्यात मशरूमची वाढ झपाट्याने होते. या हंगामात भाताच्या पेंढ्यावर त्याची लागवड करता येते. याच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लागवडीसाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. हे 6 बाय 6 च्या खोलीत देखील वाढू शकते. खोलीत सूर्यप्रकाश यायला हवा. यासाठी 15 ते 22 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
भारतीय बाजारपेठेत मशरूमच्या लागवडीपासून तुम्ही सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत चांगला नफा मिळवू शकता. बाजारात मोठ्या मॉलमध्ये मशरूमची किंमत सुमारे 250 ते 300 रुपये किलोपर्यंत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, मशरूमला भाजी म्हणून खाण्याव्यतिरिक्त, ते बॉडी बिल्डिंग उत्पादने (पावडर) बनवण्यासाठी देखील वापरले जाते.
डाळिंब शेती:- पावसाळ्यात शेतकरी बांधव डाळिंबाच्या देखील बागा लावू शकतात. त्याच्या लागवडीसाठी पावसाळा ऋतू उत्तम असल्याचे तज्ञ नमूद करत असतात. याची शेती खोल वालुकामय चिकणमाती असलेल्या जमीनीत सहज केली जाऊ शकते. अशा जमिनीत डाळिंब लागवड केल्यास शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र असे असले तरी याची लागवड क्षारीय जमिनीत देखील डाळिंब लागवड करता येते.
एवढेच नाही तर क्षारयुक्त पाण्याने सिंचन करून डाळिंबाचे चांगले उत्पादनही मिळू शकते. त्याच्या झाडांसाठी ठिबक सिंचन वापरणे चांगले मानले जाते. डाळिंबाची झाडे दोन वर्षानंतर उत्पादन देण्यास तयार होतात. दोन वर्षानंतर शेतकरी बांधव डाळिंब झाडाची पानगळ करून 120 ते 130 दिवसांत यापासून उत्पादन घेऊ शकतात. याला बाजारात कायम चांगला भाव मिळतो.