Business Idea: नवयुवक शेतकरी मित्रांनो शेती परवडत नाही का? मग शेतीसोबत ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय सुरु करा, जंगी कमाई होणारं

Ajay Patil
Published:

Business Idea: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे, आपला देश आता शेतीप्रधान देश बनला असे नव्हे तर गेल्या अनेक शतकांपासून आपला भारत देश हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जात आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने शेतीप्रधान देशाचा तमगा आपल्याला दिला जातो. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशातील विशेषत ग्रामीण भागातील नवयुवक रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय शेती (Farming) असल्याने आणि शेतीमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) नुकसान सहन करावे लागत असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याचा निकष जाणकार लोक काढत असतात. मात्र जर शेतकरी बांधवानी गावात राहून शेतीसोबतच इतर शेतीची कामे केली तर त्यांना दुप्पट उत्पन्न (Farmer Income) सहज मिळणार आहे.

मग ते पशुसंवर्धन असो, मत्स्यपालन असो, कुक्कुटपालन असो किंवा अन्न प्रक्रिया संबंधित काम असो. प्रत्येक कामामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणारं आहे. या कामांमध्ये घराच्या मागील अंगणात कुक्कुटपालनाच्या कामाचा समावेश आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते. आज आपण देखील कमी खर्चात कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Business) कसा सुरु करायचा आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कमी गुंतवणूकीत दुप्पट नफा 

ग्रामीण वातावरणात कुक्कुटपालनासारखे काम करणे खूप सोपे आहे, कारण घराच्या मागील अंगणातील बहुतेक जागा अशीच रिकामी असते. अशा परिस्थितीत या जागेचा वापर कुक्कुटपालन व्यवसायासाठी केला जाऊ शकतो. जागा स्वच्छ करून कुक्कुट पालन सुरु केले जाऊ शकते. म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसायासाठी फार्म उभारण्याची गरज भासणार नाही यामुळे यासाठी होणारा खर्च वाचणार आहे.

तुम्हाला फक्त कोंबड्यांसाठी कच्च्या बाकड्या तयार करायच्या आहेत आणि त्यांच्या आहारासाठी धान्याची व्यवस्था करायची आहे, जी शेतीच्या उत्पादनातूनच केली जाईल. त्यासाठी एक पैसाही लागणार नाही. सुरुवातीला फक्त 4 ते 5 कोंबडी खरेदी केल्यास वर्षभर अंडी विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल. शेतकरी बांधवांनी कोंबडीच्या चांगल्या प्रगत जातींचे पालन करावे यात सील, कडकनाथ, ग्रामप्रिया, स्वरनाथ, केरी श्यामा, निर्भिक, श्रीनिधी, वनराजा, कारी उज्ज्वल आणि कारी इत्यादींचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe