Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरींचा नांद सोडा अन ‘हा’ शेतीशी संबंधित व्यवसाय करा, हजारोत नाही तर लाखोंत कमवाल; कसं ते जाणुन घ्या

Ajay Patil
Updated:

Krushi News Marathi: आजकाल, बहुतेक लोकांना व्यवसाय (Business) करायचा असतो, परंतु अनेक वेळा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध नसतो किंवा पैशाअभावी बरेच लोक व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.

जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर आम्ही तुमच्यासाठी या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. वास्तविक, आमच्याकडे अशी एक व्यवसायाची कल्पना आहे, जी गावात आणि शहरात राहून अगदी सहज सुरू करता येते.

या व्यवसायाची दोन वैशिष्ठ्ये आहेत, एक म्हणजे तुम्हाला कमी खर्च येईल, दुसरे म्हणजे हा व्यवसाय तुम्हाला कृषी क्षेत्राशी (Farming) जोडून ठेवेल.

चला तर मग जाणुन घेऊया या व्यवसायाची संपूर्ण माहिती. मित्रांनो खरं पाहता, आम्ही सेंद्रिय खताच्या (Organic Fertilizer) बिझनेस आयडियाबद्दल बोलत आहोत.

आपल्या सर्वांना माहित आहे की आजकाल बाजारात सेंद्रिय शेती (Organic Farming) उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, कारण लोक त्यांच्या आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत.

सध्या लोक कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी केलेल्या भाज्या आणि फळांपासून अंतर राखत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही शेतीशी संबंधित सेंद्रिय खतांचा व्यवसाय (Organic Fertilizer Business) सुरू केला तर तो तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया सिद्ध होऊ शकतो.

सेंद्रिय खत व्यवसायासाठी गुंतवणूक:- जर तुम्ही सेंद्रिय खताचा व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठी 1-5 लाख रुपये लागतील.

सेंद्रिय खत व्यवसायासाठी जागा:- तुम्ही कोणत्याही मोकळ्या जागेवर सेंद्रिय खत बनवण्याचे काम करू शकता. यासाठी तुम्हाला बायो रिएक्टर, बायो फर्मेंटर, ऑटो क्लेव्ह, बॉयलर, आरओ प्लांट, कंपोस्ट शिलाई मशीन, कंप्रेसर, फ्रीझर, कन्व्हेयर्स आणि इतर काही मशीन्स देखील लागतील.

खत व्यवसायासाठी परवाना:- मित्रांनो हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी लक्षात घ्या की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला जीएसटी नोंदणीसह खत परवाना देखील घ्यावा लागणार आहे.

खत व्यवसायात कच्चा माल लागेल:- सेंद्रिय खत बनवण्याच्या व्यवसायात तुम्हाला मेंढ्याचे खत, शेण, कृषी कचरा, कोंबडी खत आणि रॉक फॉस्फेट कच्चा माल म्हणून आवश्यक असेल.

खत व्यवसायातुन होणारी कमाई:- या व्यवसायातून मिळणारा नफा मुख्यतः स्केलवर अवलंबून असतो. म्हणजेच तो व्यवसाय कोणत्या प्रमाणात केला गेला आहे? परंतु या व्यवसायात तुम्हाला खर्चावर 20-21 टक्के नफा मिळू शकतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, जर तुम्ही व्यवसायात 5 लाख रुपये गुंतवले असतील तर तुमची कमाई लाखो रुपये असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe