Business Idea: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. मात्र, शेती (Agriculture) मध्ये अनिश्चितता मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या डोक्यावर नाहक कर्जाचे ओझे येते.
मात्र जर शेतकरी बांधवांनी (Farmer) काळाच्या ओघात बदल करत शेतीसमवेत शेतीपूरक व्यवसाय (Agree Business) केले तर निश्चितचं शेतकऱ्यांना चांगली कमाई (Farmer Income) होणारं आहे. आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका विशेष अन्नप्रक्रिया उद्योग विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण टोमॅटोवर प्रक्रिया करून (Tomato Food Processing) कशा पद्धतीने बायो प्रॉडक्ट तयार केले जाऊ शकतात आणि त्याच्या विक्रीतून शेतकरी बांधव कशा पद्धतीने लाख रुपयांची कमाई करू शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो खरे पाहता गेल्या महिन्यात टोमॅटो पिकाला चांगला उच्चांकी बाजार भाव मिळत होता. मात्र आता टोमॅटोची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने टोमॅटोचे दर कमालीचे घसरले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना झालेला खर्च काढणे देखील अशक्य झाले आहे. मात्र जर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी या संकटाच्या काळात टोमॅटोवर प्रक्रिया करून बाय प्रॉडक्ट तयार केले तर त्यांना निश्चितच लाखोचा फायदा होणार आहे.
मित्रांनो आज आपण टोमॅटो फूड प्रोसेसिंगविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये टोमॅटोवर प्रक्रिया करून बाय प्रॉडक्ट तयार केले जातात. फूड प्रोसेसिंगद्वारे फळे आणि भाज्यांपासून उत्पादने बनवून विक्री करून चांगले उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत जेव्हा टोमॅटोला कमी दर मिळत असतील तेव्हा अन्न प्रक्रिया युनिट उभारून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
प्रक्रिया कशी करावी
पिकांचे भाव सतत चढत किंवा उतरत राहतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया युनिट उभारण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून बाजारभाव कमी असताना त्यावर प्रक्रिया करून चांगले उत्पन्न मिळवता येईल. फूड प्रोसेसिंग, प्रोसेस्ड फूडचे पॅकेजिंग, मार्केटिंग इत्यादीसाठी योग्य प्रशिक्षण घेणे देखील आवश्यक असले तरी टोमॅटो फूड प्रोसेसिंग सुरू केल्यानंतर नुकसान होण्याची शक्यता नाहीशी होते आणि त्यापासून बनवलेले उत्पादन दुसऱ्या स्वरूपात साठवता येते.
अनेक कंपन्या टोमॅटोपासून सॉस, चटणी आणि टोमॅटो प्युरी यांसारखे पदार्थ बनवतात आणि विकतात. ही उत्पादने प्रक्रिया युनिटमध्ये व्यवस्थित बनवली जातात आणि बाटल्यांमध्ये भरून बाजारात विकली जातात. ही उत्पादने बर्याच काळासाठी वापरली जाऊ शकतात.
सरकारने शेतकऱ्यांना शेतीसोबतच असे सूक्ष्म उद्योग किंवा युनिट्स उभारण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरवात केली आहे.
‘मायक्रो फूड इंडस्ट्री अपग्रेडेशन स्कीम’च्या माध्यमातून शेतकरी बांधव अनुदानाचा देखील लाभ घेऊ शकतात.
शेतकरी कोणत्याही कंपनीत सामील होऊ शकतात किंवा कृषी विज्ञान केंद्रांमधून अन्न प्रक्रियेचे प्रशिक्षण घेऊ शकतात.
अन्न प्रक्रियेसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP द्वारे भारतात अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.
या अंतर्गत अनेक खाजगी कंपन्या टोमॅटोची कंत्राटी शेती करतात आणि निर्धारित मानकांच्या आधारे शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदी करतात.
दरम्यान, कंपन्या शेतकऱ्यांचा सर्व माल खरेदी करत नाहीत, शेतकरी 75 टक्के उत्पादन कंपनीला आणि 25 टक्के पीक स्वत: मंडईत विकू शकतात.