खरीप अन् रब्बी हंगामातही सुर्यफुल लागवड करून कमवू शकता लाखो रूपये? जाणून घ्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया

Published on -

दिवसेंदिवस खाद्य तेलाच्या भावात कमालीची वाढ होत आहे. मात्र, त्या तुलतेन तेलबियांचे उत्पादन होताना दिसत नाही. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तेलबियांमध्ये महत्त्वाचे असलेल्या सूर्यफूल पेरणी क्षेत्र कमी होत आहे. मात्र, त्याचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळते.

त्याला भावही चांगला मिळतो. त्यामध्ये आंतरपीकही घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप, रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकाचा विचार करण्यास काहीच हरकत नाही. सूर्यफुल पेरणीची वेळ, मशागत, कीड, खते व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती.

जमीन- सूर्यफल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पायात कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.

पेरणीची वेळ- खरीप जुलै पहिला पंधरवडा, रब्बी ऑक्टोबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा, उन्हाळी फेब्रुवारी पहिला पंधरवडा. पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमिनीत ४५ से.मी. ७ ३० से.मी. भारी जमिनीत ६० से.मी. ३० से.मी. तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० सें.मी. ७ ३० सें. मी. अंतरावर करावी.

पेरणी पद्धत- कोरडवाहू सूर्यफलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळीपालना बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.

बियाणे- सुर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ते किल्ला प्रति हेक्टरी वापरावे. बीजप्रक्रिया: केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झिल ३५ डब्ल्यू.एस. प्रति किलो बियाण्यास चोळावे च केवाडा जन्य (नक्रासिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी धायामिथोक्झाम ३००६ एफ. एस. १० मिली प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

आंतरपीक- भूईमूग, तूर ओळीत आंतरपीक लागवड केल्यास फायदा होतो. उत्पादन वाढते. रासायनिक खते : कोरडवाहू क्षेत्रास २.५ टन प्रतिहेक्टरी शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, २५ किलो पालाश द्यावे. नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी ३० किलो पेरणीवेळी द्यावे. उवरित उगवणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावे. गंधकाची कमतरता असल्यास २० किलो गंधक पेरणीवेळी गांढूळ खतात एकत्र करून द्यावे.

आंतरमशागत- पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सेंटीमीटर ठेऊन विरळणी करावी. पेरणीनंतर पंधरा दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी दुसरी ३५ ते ४० दिवसांनी करावी.
पाणी व्यवस्थापन- सुर्यफुलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. रोप अवस्था, फुलकळी, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याच अवस्था आदी संवेदनक्षम अवस्थेत पाण्याचा ताण पढू देऊ नये. अथवा दाणे पोकळ राहतात. उत्पादन : कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल, बागायती / संकरित वाणापासून प्रति हेक्टरी १७ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.

काढणी- सुर्यफूलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.

कीड रोगांपासून कसे रोखावे

विषाणूजन्य रोग हा रस शोषणाऱ्या किड्यांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी १७.८ टक्के एस. ल. १ मिली १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके वेचून त्यांचा नाश करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!