Chilli Farming: भारतात भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) अलीकडे मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जात आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) व्यावसायिक शेती आता मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो मिरची (Chilli crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
शेतकरी बांधव मिरची या भाजीपाला पिकाची शेती करून चांगले उत्पन्न देखील कमवत असतात. मिरचीची पिकं कमी दिवसात आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होत असल्याने शेतकरी बांधव मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असल्याचे चित्र आहे. मिरचीचे पीक कमी खर्चात आणि कमी दिवसात जरी तयार होत असले तरी देखील या पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे सावट असते तसेच या पिकात वेगवेगळ्या रोगाचादेखील प्रादुर्भाव बघायला मिळतो.

अशा परिस्थितीत मिरचीचच्या पिकाची योग्य काळजी घेतली नाही तर शेतकरी बांधवांना नुकसान सहन करावे लागू शकते. जाणकार लोक मिरचीच्या पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकरी बांधवांना वारंवार पिकाचे निरीक्षण करण्याचा सल्ला देतात.
मित्रांनो मिरचीच्या पिकात फुलकिडे या कीटकाचा देखील प्रादुर्भाव बघायला मिळतो. फुलकिडे या कीटकांमुळे मिरचीच्या पिकाचे अतोनात नुकसान होते आणि उत्पादनात मोठी घट होते. अशा परिस्थितीत या किटकांवर वेळीच नियंत्रण (pest control) मिळवणे किंवा व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक बाब आहे. यामुळे आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मिरची पिकावरील फुलकिडे या किटकावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
मिरची पिकावरील फुलकिडे:-
फुलकिडे मिरचीच्या पिकांचा पानांतील रस शोषून घेतात. यामुळे मिरचीच्या पिकाची हानी होते आणि पिकांच्या पानाच्या कडा वरील बाजूस वळून जातात.
फुलकिडे या कीटकाचा मिरची पिकावर प्रामुख्याने शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला प्रादुर्भाव आढळत असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत असतात.
या फुलकिडे कीटकांचा मिरचीच्या पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मिरची पिकाची पाने लहान होतात. याला आपल्याकडे शेतकरी बांधव बोकड्या किंवा चुरडा-मुरडा रोग असे म्हणत असतात.
मिरची पिकातील फुलकिडे किटकावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवले जाते बरं…!
जाणकार लोक फुलकिड कीटकच्या जैविक नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे एकरी 12 याप्रमाणे लावण्याचा सल्ला देत असतात.
मिरची पिकातील फुलकिडे किटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रासायनिक फवारणीचा देखील अवलंब केला जातो.
ॲसिटामिप्रीड (20 टक्के एस.पी.) 1 ग्रॅम या औषधाची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.
फेनपायरॉक्झिमेट (5 टक्के ई.सी.) 1 मिलि किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल (10.26 टक्के ओ.डी.) 2 मिलि या औषधांची फवारणी करून मिरची पिकातील फुलकिडे कीटकांवर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
मित्रांनो कोणत्याही पिकावर आणि कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा, कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला हा अपरिहार्य राहणार आहे. इथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही.