Cotton Farming : कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचा नायनाट होणार! पोळ्याच्या अमावसेच्या दिवशी फक्त ‘हे’ काम करावं लागणार

Published on -

Cotton Farming : भारतात कापसाची लागवड (Cotton Farming) विशेष उल्लेखनीय आहे. भारताच्या एकूण कापूस उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत राज्यात असलेले कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण कापूस (Cotton Crop) या पिकावर अवलंबून आहे. सध्या राज्यातील कापूस हा फुलधारणा अवस्थेत असून काही ठिकाणी कापसाला कैऱ्या लागायला सुद्धा सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी कापसाची आगात पेरणी केली गेली होती त्या ठिकाणी कैऱ्या किंवा बोन्डे लागायला सुरुवात झाली आहे.

या अशा परिस्थितीत कापसाच्या पिकाला सर्वात मोठा धोका असतो तो गुलाबी बोंड अळीचा (Pink Bollworm) ज्याला अनेक भागात शेंद्री अळी म्हणून देखील ओळखले जाते. यामुळे या कीटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी येत्या अमावस्येचा दिवस विशेष खास ठरणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जमिनीत सुप्त अवस्थेत गेलेले कापसात केल्या जाणाऱ्या मशागतीमुळे जमिनीवर येतात. पावसाच्या पाण्यामुळे या कोषातून गुलाबी बोंड अळीचे पतंग बाहेर येतात. हे गुलाबी बोंड आळी पतंग कापसाच्या पिकावर विशेषता पानावर आणि फुलांवर बसतात. हे कापसावर बसलेले पतंग अमावस्येच्या दिवशी अंडी घालत असतात. या अंड्यांतून सुमारे दोन ते तीन दिवसात गुलाबी बोंड अळी बाहेर येते.

मित्रांनो खरे पाहाता गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण (Cotton Pest ) फक्त अंडी नष्ट करून केले जाऊ शकते किंवा प्राथमिक अवस्थेत म्हणजे जेव्हा कीटक अगदी सूक्ष्म अवस्थेत असतात तेव्हा या कीटकांचे नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना (Cotton Grower Farmer) पोळा अमावस्याच्या दोन दिवस आधी किंवा अमावस्याच्या दोन दिवस नंतर अंडी नाशक औषधांची फवारणी करावी लागते. यामुळे अमावस्याच्या दिवशी कापूस पिकावर फवारणी (Cotton Crop Management) करण्याचे महत्त्व खूप अधिक आहे.

कापूस पिकावर अमावस्याच्या दिवशी ही फवारणी करा बर…!

कापूस उत्पादक शेतकरी सांगतात की, बोंडअळीचे अंडी नष्ट करण्यासाठी प्रोफेनाफाँस 40 % सायपरमेथ्रिन 04 % घटक असलेले कोनत्याही कंपनीच्या किटकनाशकाचा वापर करता येतो. याबरोबर पातेगळ होऊ नये म्हणुन बुरशीनाशक व पिकाच्या सर्वागीन विकासासाठी चांगल्या दर्जाचे टाँनिकचा वापर करावा. पातेधारणा कमी असेल तर 12-60-00 या विद्राव्य खताचा सुध्दा अवश्य वापर करावा. मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही. यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe