Cotton Market Rate : कापसाच्या दरात क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांनी वाढ! येणाऱ्या कालावधीत काय राहील कापूस भावाची स्थिती?

Published on -

Cotton Market Rate : मागच्या हंगामामध्ये कापसाने बाजार भावाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केली. दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा इतकी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस न विकता बाजार भाव वाढेल या अपेक्षेने घरात साठवून ठेवला. परंतु कापसाने 8000 च्या पुढे टप्पा ओलांडला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापसाचे नवीन लागवड झाली असून अजून दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये नवीन कापूस घरात यायला लागेल.

परंतु अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा मागच्या हंगामातील कापूस घरामध्ये साठवलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण सध्या देशांतर्गत कापूस बाजाराचा विचार केला तर गेल्या दोन दिवसांमध्ये कापूस दरांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली आहे. याचा अनुषंगाने आता येणार्‍या दिवसात कापसाचे वाढलेले दर टिकून राहतील का हे देखील पहाणे महत्त्वाचे आहे.

 कापूस दराला मिळत आहे चांगला आधार

सध्या देशांतर्गत बाजारातील कापूस दराची स्थिती पाहिली तर गेल्या दोन दिवसांमध्ये यामध्ये सुधारणा दिसून आले आहे. यामागे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत कापसाला मागणी काढल्यामुळे दरात सुधारणा झाल्याची सध्या स्थिती आहे. यावर्षी कापूस लागवडीचा विचार केला तर जून महिना कोरडा गेल्यामुळे कापसाची लागवड मागच्या हंगामाच्या तुलनेत काहीशी कमी झाल्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

गेल्यावर्षीच्या 121 लाख हेक्टर कापूस लागवडीच्या तुलनेमध्ये यावर्षीही लागवड 119 लाख हेक्टर इतकी झाली आहे. म्हणजेच तब्बल दोन लाख हेक्टर लागवड यावर्षी कमी आहे. तसेच महाराष्ट्रातील जर आपण काही कापूस उत्पादन घेणारे प्रमुख भाग पाहिले तर या ठिकाणी देखील पाऊस यावर्षी कमी झाला आहे. यावर्षीच्या हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे.

या सगळ्या हवामानाचा अथवा पावसाच्या परिस्थितीचा कापूस पिकावरील परिणाम होऊ शकतो. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये अनेक सण येणारे असून या दिवसांमध्ये कपड्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. साहजिकच कपड्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सूत लागेल व सुत तयार करण्यासाठी कापसाची मागणी वाढेल. या कारणामुळे देखील आता कापसाचे व्यवहारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे गेल्या दोन दिवसापासून कापूस दरामध्ये प्रतिक्विंटल तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. साधारणपणे आज कापसाचे दर साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. यामध्ये चालू महिन्यात थोडीफार चढउतार होऊ शकते परंतु झालेली ही दरवाढ टिकण्याची जास्त शक्यता आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये कापूस दराला खूप चांगला आधार मिळण्याची शक्यता असल्याचे मत देखील या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!