Cow Farming Tips : गाई-म्हशी कमी दूध देताय..! मग कॅल्शियम खाऊ घाला, दुधाचे उत्पादन तर वाढणारच शिवाय गर्भपात देखील होणार नाही, आधी डिटेल्स वाचा

Published on -

Cow Farming Tips : मित्रांनो पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry) यशस्वी होण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmer) पशूंच्या आरोग्याची (Animal Care) विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जाते.

पशूंचे आरोग्य अबाधित राखल्यास पशुपालन व्यवसायातून शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Income) होऊ शकते. मित्रांनो पशुपालन व्यवसाय मुख्यता दुग्ध उत्पादनासाठी (Dairy Farming) केला जातो. मात्र पशूंचे आरोग्य बिघडल्यास दूध उत्पादनात घट होत असते.

त्यामुळे आज आम्ही त्यांच्या दूध उत्पादनात कशा पद्धतीने वाढ घडवले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन झालो आहोत. मित्रांनो खरे पाहता आज आपण पशूमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास कशा पद्धतीने दूध उत्पादन कमी होऊ शकते. तसेच कॅल्शियम कमीचे लक्षणे नेमकी कोणती याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो माणसांप्रमाणेच प्राण्यांसाठीही कॅल्शियम खूप महत्त्वाचे आहे. प्राण्यांच्या संतुलित आहारात कॅल्शियमचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावर अशक्त होते, त्याचप्रमाणे दूध निर्मितीची क्षमताही कमी होते. दुभत्या जनावरांना दररोज 50 मिली कॅल्शियम दिले पाहिजे. त्यामुळे जनावराची गर्भधारणेची क्षमता वाढते. याशिवाय गर्भपात होण्याची शक्यता खूप कमी होते.

प्राण्यांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

  • ज्या जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते असे जनावर बहुतेक वेळा पोट आणि मान दुमडून बसतात.
  • जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा कमी होते.
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरे देखील बेहोश होऊ शकतात.

प्राण्यांच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करण्याचे फायदे

  • जनावरांच्या आहारात कॅल्शियमचा समावेश केल्यास दुधाचे उत्पादन वाढते.
  • प्राण्यांच्या आहारात कॅल्शियमचा समावेश केल्यास जनावरांमध्ये गर्भधारणेची क्षमता वाढते.
  • मादी जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.

असा संतुलित पशु आहार ठेवा

  • प्राणी निरोगी राहण्यासाठी प्राण्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
  • आहार संतुलित आणि भरपूर पोषक असावा.
  • जनावरांना दिलेल्या चारापैकी दोन तृतीयांश हिरवा चारा आणि एक तृतीयांश कोरडा चारा असावा.
  • दूध देणाऱ्या जनावराच्या खाद्यात सुके धान्यही मिसळावे.
  • तीन लिटर दुधामागे एक किलो धान्य द्यावे.
  • याशिवाय जनावरांना दररोज 50 ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
  • असे केल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते.

मित्रांनो, जनावरांना कोणताही आहार देण्याआधी पशुवैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही. कोणत्याही गोष्टीचा अवलंब करणेअगोदर तज्ञ लोकांचे मार्गदर्शन अतिशय आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe