Cow Farming Tips : गायपालन करण्याचा बेत आखलाय…! मग दिवसाला 50 लिटर दूध देणाऱ्या हरधेनू गाईचे पालन करा

Published on -

Cow Farming Tips : आपल्या देशात पशुपालन (Animal Husbandry) गेल्या अनेक दशकांपासून केले जात आहे. पशुपालनात आपल्या देशात गायीचे संगोपन (Cow Rearing) मोठ्या प्रमाणात केले जाते. मित्रांनो पशुपालन मुख्यतः दुधाचा व्यवसाय (Dairy Farming) करण्यासाठी केलं जात.

या व्यवसायाला आपण डेअरी फार्मिंग म्हणतो. आजच्या काळात अनेक शेतकरी व पशुपालक (Livestock Farmer) या व्यवसायातून चांगला नफा (Farmer Income) कमावत आहेत. मित्रांनो जर तुम्हीही पशुपालक असाल आणि तुम्हाला गाय पालन करायचे असेल तर आजचा हा लेख विशेष तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे.

मित्रांनो तुम्हाला जर गाय पालन करायचे असेल तर तुम्ही गायीच्या प्रगत जातींची (Cow Breed) माहिती जरूर ठेवावी, कारण गायीची जात जितकी चांगली असेल तितका चांगला नफा तुम्हाला गाय पालन व्यवसायातून मिळणार आहे.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला गायीच्या अशाच एका प्रगत जातीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे संगोपन करून तुम्ही मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करू शकता. मित्रांनो आज आपण भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या आणि तब्बल 55 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेल्या हरधेनु गाई (Hardhenu Cow) विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हरधेनू गाय भारतीय वैज्ञानीकांनी विकसित केलेली गाईची एक संकरित आणि सुधारित जात आहे. या जातीला तिच्या चांगल्या दूध उत्पादनामुळे कामधेनू असं देखील म्हणतात. या गाईला हरियाणाच्या लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या (लुवास) येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

ही गाय 3 जातींमधून संकर करून विकसित करण्यात आली असल्याने या जातीची गाय अधिक दूध उत्पादन देण्यास तसेच या जातीची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हरधेनू गाय उत्तर-अमेरिकन (होलस्टीन फ्रिजन), देसी हरियाणा आणि साहिवाल जातीपासून क्रॉस ब्रीड करण्यात आली आहे.

दुग्ध व्यवसायातील जाणकार लोक या जातीची माहिती देताना सांगतात की, हरधेनू जातीच्या गायी 50 ते 55 लिटरपर्यंत दूध देऊ शकतात. तीन जातींचा संकर करून तयार करण्यात आलेली हरधेनू जातीची गायमध्ये होलस्टीन फ्रिजन गायीचे 62.5 टक्के रक्त आढळते तसेच हरियाणा आणि साहिवाल जातींचे 37.5% रक्त असते.

या संकरित जातीची इतर गायींशी तुलना केल्यास अस आढळून आल आहे की, स्थानिक जाती दररोज सरासरी 5 ते 6 लिटर दूध देतात तर ही हरधेनु संकरीत गाय दररोज सरासरी 15 ते 16 लिटर दूध देऊ शकते. जाणकार लोकांच्या मते, ही गाय एका दिवसात 40 ते 50 किलो हिरवा चारा तसेच 4 ते 5 किलो सुका चारा खाते. निश्चितच या जातीचा खुराक देखील इतर जातींच्या तुलनेत चांगला आहे. अशा परिस्थितीत ही जात दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निश्‍चितच फायद्याची ठरणार आहे.

हरधेनु गाईचे वैशिष्ट्य तर जाणून घ्या 

हरधेनू जातीची गाय सुमारे 20 महिन्यांत प्रजननासाठी तयार होते, तर स्थानिक जातीला यासाठी 36 महिने लागतात.

ही गाय 30 महिन्यांपासून वासरे देण्यास सुरुवात करते, तर इतर जाती 45 महिन्यांपासून जन्म देतात.

संकरित गाय हरधेनू दूध उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते.

या जातीची अजून एक विशेषता म्हणजे या जातीच्या गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण देखील इतर जातींच्या गाईंपेक्षा अधिक आढळते.

भारतीय हवामानात ही गाय चांगले दूध उत्पादन देत असते. खरे पाहता, या गायी कोणत्याही तापमानात राहू शकतात.

या जातीच्या गाईपासून 50 ते 55 लिटर दूध मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe