Cow Farming Tips : गाई-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी करा या उपायोजना ; फायदाच होणार

Ajay Patil
Published:
cow farming tips

Cow Farming Tips : भारतात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात प्रामुख्याने गाई म्हशींचे संगोपन केले जाते. गाई म्हशींचे संगोपन हे विशेषता दुग्ध उत्पादनासाठी होते. मात्र दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा पशुपालक चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात.

बाजारात येत असलेल्या वेगवेगळ्या इंजेक्शनचा वापर करून जनावरांचे दूध वाढवले जाते. यामुळे निश्चितच सुरुवातीला दुग्धोत्पादनात वाढ होते मात्र या दुधाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तसेच इंजेक्शन दिल्यामुळे गाई म्हशींचे आरोग्य देखील धोक्यात येते.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. गाई म्हशींना दिल्या जाणाऱ्यां आहारावर दुधाचे उत्पादन हे अवलंबून असतं. पशुना जर पूरक खाद्य तसेच औषधी वनस्पती किंवा काही घरगुती औषध दिले तर 100% दूध वाढते. आज आपण अशाच एका घरगुती उपचाराविषयी जाणून घेणार आहोत.

हा घरगुती उपचार करा गाई म्हशींचे दूध वाढणार

गाई म्हशींचे दूध वाढवण्यासाठी मोहरीचे तेल आणि पीठ हा एक गुणकारी उपाय आहे. मोहरीचे तेल 300 ग्राम आणि मैदा 250 ग्राम एकत्रितपणे पशूंना खाऊ घातले पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा की पशुंना हे औषध सायंकाळी ज्यावेळी पशुला चारा आणि पाणी दिलं जातं त्यानंतर तिने पाहिजे. औषधानंतर पशूला पाणी देऊ नये. औषधात देखील पाणी घालायचं नाही. हे औषध सात ते आठ दिवस द्या. आणि सोबतच पशूला सकस असा आहार दिला पाहिजे. यामुळे गाईचे दूध उत्पादन वाढण्यास हळूहळू मदत होते.

याशिवाय गाई म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी चवळीचा चारा दिला जाऊ शकतो. चवळीमध्ये असलेले औषधी गुणधर्म गाई म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यास मदत करतात. चवळी पचायला सोपी असल्याने पशूंचे पाचन तंत्र मजबूत होते आणि यामुळे दूध उत्पादनात हळूहळू वाढ होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याशिवाय पशुपालक शेतकरी बांधव 250 ग्रॅम गव्हाची लापशी, 100 ग्रॅम गुळाचे सरबत, 50 ग्रॅम मेथी, कच्चं खोबरे, 25 ग्रॅम जिरे, 25 ग्रॅम सेलेरी यापासून एक औषध तयार करू शकतात. हे औषध तयार करण्यासाठी सर्वप्रथम दाळ, मेथी, गूळ शिजवून घ्या. नंतर खोबरे बारीक करा आणि मिक्स करावे. हे थंड झाल्यावर जनावरांना खायला दिले पाहिजे.

हे औषध जनावरांना दोन महिने रिकाम्या पोटी खायला दिले तर दुधाच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा केला जातो. ही प्रक्रिया गाई व्यायनाआधी एक महिना सुरु करावी लागते. गाई व्यायला नंतर एक महिन्यापर्यंत हे औषध द्यावे. तसेच 25-25 ग्रॅम अजवाईन आणि जिरे वासराला 3 दिवसांनीच द्यावे. वासरू झाल्यानंतर 21 दिवसांपर्यंत गाईला सामान्य आहार देत रहा. त्यामुळे दुधाची क्षमता वाढेल.

वर नमूद केलेल्या कोणत्याही खुराकाचा अवलंब करण्यापूर्वी पशु तज्ञांशी संपर्क करणे अनिवार्य राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe