Custard Apple Cultivation:- महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. यामध्ये जिल्ह्यानुसार विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष तर काही भागांमध्ये डाळिंब सारख्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच त्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये पेरू व सिताफळ यांची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
ज्याप्रमाणे इतर पिकांच्या अनेक व्हरायटी असतात तसेच फळबागांमध्ये देखील अनेक प्रकारच्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये सिताफळ लागवड आणि त्यासाठी लागणारा खर्च व नफा यांचा एकत्रित विचार केला तर सिताफळ लागवड ही शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे. कमीत कमी खर्चात व कमीत कमी पाण्यामध्ये सिताफळ चांगले उत्पादन देऊ शकते.
सीताफळाच्या देखील अनेक प्रकारच्या जाती आहेत व त्या त्या जातींचे त्यांच्यानुसार वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. याचा अनुषंगाने जर आपण सीताफळाच्या एप्पल सिताफळ या जातीचा विचार केला तर बीड या ठिकाणच्या एका संशोधन केंद्रामध्ये ही जात विकसित करण्यात आलेली असून शेतकऱ्यांसाठी ती खूप फायद्याची ठरणारी जात आहे.
काय आहे एप्पल सिताफळ?
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये कस्टर्ड सफरचंद म्हणजेच एप्पल सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. बीड येथील एका संशोधन केंद्रामध्ये ही जात विकसित करण्यात आलेली असून इतर सीताफळांच्या जातीपेक्षा ही जात खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर सीताफळांच्या जातींच्या तुलनेत जर आपण कस्टर्ड ॲप्पल या जातीचा विचार केला तर इतर जातींमध्ये बियांचे प्रमाण प्रतिफळ 25 ते 30 असते.
परंतु एप्पल कस्टर्ड म्हणजेच एप्पल सिताफळामध्ये बियांचे प्रमाण अवघे चार इतके असते. त्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील या सिताफळाला खूप मागणी आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी कस्टर्ड ॲप्पल म्हणजे सीताफळावर संशोधन करणारे केंद्र असून यामध्ये 21 विविध प्रकारचे कस्टर्ड एप्पल तयार करण्यात आलेले आहेत.
तसेच हे फळ इतर सीताफळापेक्षा खाण्यास देखील उपयुक्त आहे. विशेष म्हणजे याला सरकारकडून पेटंट देखील मिळाले आहे. साधारणपणे 2016 या वर्षापासूनचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आतापर्यंत कस्टर्ड ॲप्पल संशोधन केंद्राच्या माध्यमातून 300 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये सिताफळ कलमांची लागवड केलेली आहे.
अंबाजोगाई येथील संशोधन केंद्रामध्ये तयार केलेल्या कस्टर्ड ॲप्पलच्या रोपांची लागवड राज्यातील जळगाव, सोलापूर, धाराशिव तसेच नागपूर, लातूर आणि बीड व नाशिक तसेच नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर केली आहे. आजपर्यंत या संशोधन केंद्रामध्ये कस्टर्ड ॲप्पलची आठ लाख कलम रोपे तयार करण्यात आलेले आहेत.
कस्टर्ड सफरचंद अर्थात कस्टर्ड ॲप्पल प्रक्रिया उद्योगासाठी आहे महत्त्वाचे
या सिताफळ संशोधन केंद्राच्या माध्यमातून या कस्टर्ड ॲप्पल अर्थात या कस्टर्ड सफरचंदाच्या जातीवर प्रक्रिया देखील केली जाणार आहे व त्यापासून आईस्क्रीम, रबडी तसेच कुल्फी बनवली जाणार आहे. भविष्यकाळामध्ये या जातीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे कस्टर्ड ॲप्पल च्या उत्पादनाकरिता खूप कमी पाणी लागते आणि त्या माध्यमातून उत्पादन खूप चांगले मिळते.