Tur Market Today : मागणी जास्त आवक कमी असे चित्र असल्याने तुरीच्या दरात रोज वाढ होत राहिली. हिंगणघाट बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी १३ हजार रुपये प्रति क्विंटल भावात तुरीची खरेदी करण्यात आली.
ऑक्टोबर महिन्यात हा दर घसरला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला १२ हजारांवर पोहचला आता १० हजार १०० ते ११ हजार ३२५ रुपये क्विंटल च्या दरात तुरीची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
सद्यस्थितीत तुरीची मागणी जास्त आहे त्या तुलनेत बाजारातील तूर आवक कमी आहे. वर्धा जिल्ह्यात तूर उत्पादन नगण्य राहिले. अनेकांनी गरजेपोटी तुरीची विक्री केली. दरवाढीच्या अपेक्षित तूर राखून ठेवणाऱ्या शेतकर्यांसाठी ही आनंदायी बातमी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होती.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तुरीला बुधवार ६ सप्टेंबर रोजी उच्चांकी दर मिळाला १२ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे तूर खरेदी झाली.
७ सप्टेंबर नंतर तुरीच्या भावात अपेक्षित वाढ होऊन ती ९३ हजार रुपये प्रति क्विंटल वर पोहोचली. चौकशी दरम्यान अनेकांनी तुरीचा दर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पंधरा हजारा दरम्यान असेल असे भाकीत वर्तविले
जिल्ह्यात अनेक लहान व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर खरेदी केली. घरी व गोदामांमध्ये ती साठवून ठेवण्यात आली.
दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांनी तूर १३ हजार रुपयांवर पोहोचताक्षणी साठतून असलेला शेतमाल बाजारपेठेत आणला. प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपयांचा नफा कमविण्याचे सांगण्यात येते आहे.
शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
सणांच्या दिवसात तूर डाळीचा दर ७६ रुपये किलोवर पोहोचला त्या तुलनेत तुरीचा प्रतिकिलो दर कमी आहे . ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान तूरीच्या दरात दरवर्षी तेजी येते यावर्षी तीच चाहूल सप्टेंबर महिन्यात लागली म्हणून शेतकऱ्यांनी तूर राखवून ठेवली प्रतिक्रिंटल दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचा ओपक्षाभंग झाला आहे