Agricultural News : आवक घटल्याने मुगाची चमक वाढली ! मिळतोय इतका बाजारभाव

Published on -

Agricultural News : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात मूग पेरणीनंतर पावसाने दोन महिने दीर्घ विश्रांती घेतल्याने मूग, उडीद पिकांचा फूल फळापूर्वीच धुराळा झाला, काही शेतकऱ्यांना घरखर्चापुरता पदरात पडला,

त्यामुळे आडत बाजारात मुगाची आवक घटल्याने बाजारपेठेत यंदा मूग चांगला भाव खात असून, मुगाची चमक दरवर्षीपेक्षा यंदा जास्त वाढल्याचे दिसत आहे.

सुपा परिसरातील अनेक शेतकरी मुगाचे पिक घेतात. छोटे शेतकरी खाण्यापुरते पेरतात. मूग डाळीसाठी तर उडीद पापडासाठी वापरतात, त्यामुळे मूग व उडदाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.

यंदाही शेतकऱ्यांनी मुगाचे पिक घेतले; परंतु पेरणी नंतरपावासाने दोन महिने उघडीप दिल्याने फुलोऱ्यापूर्वीच मूग करपून गेला. ज्यांचे पिक थोडयाफार प्रमाणात हाती लागले त्यांनाही दाळीपुरतेच पदरात पडले,

त्यामुळे शेतकऱ्यांचा मूग बाजारात विक्री साठी न आल्याने आवक घटली व मुगाचे बाजार वधारले. बाजारपेठेत सध्या मूग सर्वाधिक भाव खात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जे भरमसाठ पिकते त्याला बाजारात मातीमोल भाव मिळतो व जे पसाभर पिकते त्याला सोन्याचा भाव मिळत आहे.

मागणी तसा पुरवठा होत नसल्याने यंदा मुगाचा भाव १० हजारांच्या पुढे गेला आहे. यंदा मुगाचे पिक कमी प्रमाणात उत्पादित झाल्याने आत बाजारात मुगाची आवक त्या नव्हे तर किलोत येत असल्याने मुगाची चमक चांगलीच वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe