Farmer Days 2023: शेतकरी दिन कधी आणि का साजरा केला जातो? काय आहे त्यामागील इतिहास? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:

Farmer Days 2023:- भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारताचे अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातून भारताच्या विकासामध्ये शेतकऱ्यांची भूमिका अनन्यसाधारण अशी आहे. आज भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या बाबतीत भारतीय शेतकऱ्यांनी जी भूमिका बजावलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे.

आज जर आपण भारतीय शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने तसेच समस्या असून सरकारने ज्या प्रमाणात या शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्यांकडे लक्ष द्यायला हवे तितके अजून देखील दिले जात नाही. याच पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिन अर्थात किसान दिवस साजरा केला जातो

व या माध्यमातून शेतकऱ्यांपुढील जे काही आव्हाने तसेच गरजा असतात त्या सोडवता याव्यात यासाठी देशभरामध्ये विशेष कार्यक्रम आणि शेतकरी परिषदांचे आयोजन देखील केले जाते.बऱ्याचदा अतिवृष्टी, दुष्काळ व बऱ्याचदा बियाण्यांसारख्या पायाभूत सुविधांचा अभाव यासारख्या समस्या आणि अडचणींना शेतकऱ्यांना कायम सामोरे जावे लागते.

शेतीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा संघर्ष हे शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचे, संयमाचे आणि सामर्थ्याची प्रतीक आहे. देशाच्या अन्नसुरक्षा मध्ये शेतकऱ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे व त्यांच्या कष्टाने आज भारत अनेक बाबतीत समृद्धीच्या शिखरावर आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी दिन साजरा केला जातो. परंतु शेतकरी दिनाची सुरुवात कशी झाली किंवा यामागील इतिहास काय आहे? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 शेतकरी दिन का साजरा केला जातो?

23 डिसेंबर हा भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस आहे व त्यांचा हा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक प्रकारच्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या होत्या.

चौधरी चरण सिंग हे असे पंतप्रधान होते ज्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. याकरिताच चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस भारतामध्ये शेतकरी दिवस अर्थात शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. साधारणपणे 2001 पासून शेतकरी दिन साजरा करण्याची परंपरा आहे.

 शेतकरी दिनाचे महत्त्व काय आहे?

1- शेतकऱ्यांचे योगदान भारता खेड्यांचा देश असून भारतामध्ये करोडो शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतात व विविध प्रकारचे पिके आणि इतर कृषी उत्पादनाचे उत्पादन करून देशाला प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. शेतकरी हे भारताच्या आर्थिक धोरणाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत आणि आर्थिक संरक्षणामध्ये देखील त्यांचे योगदान मोठे आहे.

2- शेतकऱ्यांच्या समस्या चांगले उत्पादन मिळवण्याकरिता शेतकरी शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करतात.या कालावधीमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांना व समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये हवामानाचे स्वरूप तसेच जमिनीची सुपीकता इत्यादी माध्यमातून अनेक समस्या उद्भवतात.

त्यामुळे शेतकरी दिनाच्या निमित्ताने या समस्या सोडवण्याकरिता चिंतन केले जाते. देशभरामध्ये असे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या समस्यांवरील उपायांची माहिती किंवा जाणीव करून दिली जाते.

3- स्वावलंबी शेतकरी शेतकरी दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना आठवण करून दिली जाते की सगळ्यांना मिळून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी नवीन आणि सुरक्षित मार्गाकडे अर्थपूर्णपणे वाटचाल करण्याची किंवा पावले उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्याकरिता व सुरक्षित बियाण्यांचा वापर करण्यासाठी आणि विपणनाकरिता नवीन उत्पादनांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी समर्थन दिले पाहिजे.

4- शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याकरिता, विविध साहाय्य योजनांद्वारे आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि त्यांना नवीन संधीचा सामना करण्यास प्रवृत्त करण्याकरिता आपल्याला सगळे मिळून एकत्र काम करणे गरजेचे आहे.

तरच या माध्यमातून देशाचा विकास होऊ शकतो. यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान अगणित आहे आणि त्यांची महत्त्वाची भूमिका निभावण्यात आपल्या सर्वांचे योगदान आवश्यक आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे शेतकरी दिन हा खूप महत्त्वाचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe