Farmer Loan: शेतकऱ्यांना आता झटक्यात मिळेल कर्ज! केंद्र सरकारची ही प्लॅनिंग येईल कामाला

Ajay Patil
Published:
farmer loan update

Farmer Loan:- पिक कर्ज किंवा शेतीसाठी लागणारा पैसा वेळेवर उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि शेती उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कारण आधीच अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून नेला जातो व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या सगळ्या आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते व हा पैसा बऱ्याचदा शेतकरी बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेऊन उभा करतात.

परंतु बऱ्याचदा बँकांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होत नाही व शेतीची कामे रखडतात. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात व या चक्रात अडकतात.ही समस्या डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी हाती घेण्यात येत असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी वेग यावा याकरिता अनेक उपाय योजना देखील करण्यात येत आहेत.

जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर पैसा उपलब्ध व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत व त्याचाच भाग म्हणून भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतेच किसान ऋण पोर्टलचे उद्घाटन केले. याचीच अपडेट या लेखात आपण बघणार आहोत.

 किसान ऋण पोर्टल शेतकऱ्यांना येईल कामाला

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, देशाचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय व कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते महत्त्वकांक्षी असलेल्या किसान ऋण पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. हे पोर्टल अनेक सरकारी विभागांच्या मदतीने विकसित करण्यात आले असून  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत येणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ताबडतोब पोहोचण्यास मदत होणार आहे.

या पोर्टलच्या अंतर्गत कर्जाचे वितरण तसेच शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा, व्याज सहाय्य आणि इतर माहिती या पोर्टलवर उपलब्ध असणार असून किसान क्रेडिट कार्ड  अंतर्गत जे काही कर्जधारक आहेत त्यांची माहिती देखील या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत आता संपूर्ण केसीसी धारकांची  पडताळणी आधारच्या माध्यमातून केली जाणार असून त्यातून शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याला सहाय्य मिळणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किसान ऋण पोर्टलच्या माध्यमातून लाभधारकांच्या खात्यामध्ये थेट व्याजाची सवलत देखील उपलब्ध होणार आहे. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी आणि थकबाकीदार शेतकरी यांचे संपूर्ण माहिती सरकारला उपलब्ध होणार आहे. किसान ऋण पोर्टल सोबतच घर घर केसीसी या महत्त्वपूर्ण अभियानाची देखील सुरुवात करण्यात आलेली आहे व त्यातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे हे पोर्टल नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe