अरे वा ! शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये भाडे मिळणार ; राज्य सरकार दिवसा विजेसाठी सौरपॅनल बसवणार

Published on -

Farmer Scheme : वीज ही शेतकऱ्यांसाठी अति आवश्यक आहे. मात्र असे असले तरी आजही आपल्या राज्यात शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना केवळ आठ घंटे वीज दिली जाते ती देखील रात्रीच्या वेळी अधिक भेटते. यामुळे शेतकरी बांधवांना पिकाला पाणी देण्यासाठी नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो.

जे मोठे आणि सधन शेतकरी आहेत ते डिझेल पंपाच्या सहाय्याने पिकांना पाणी देतात मात्र गरीब व अल्पभूधारक शेतकरी यामुळे भरडला जातो. दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने शासकीय व खाजगी जमिनीवर सौर पॅनल उभारले जाणार असून यातून शेतकऱ्यांना वीज पुरवली जाणार आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 टक्के फिडरवर सौर पॅनल बसवले जाणार आहेत. हे सौर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे शासनाकडून अशा शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात भाडे दिले जाणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये यासाठी भाडे मिळणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 86 ठिकाणी असलेली जवळपास 1800 एकर शासकीय जमीन आणि साठ ठिकाणी असलेले खाजगी 946 एकर जमीनीवर सौर पॅनल बसवले जाणार आहेत. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदय यांच्यासमोर आला आहे. विशेष म्हणजे सौर ऊर्जेतून निर्माण होणारे संपूर्ण वीज ही शेतकऱ्यांसाठी राहणार आहे.

म्हणजेच याचा वापर केवळ शेतीपंपासाठी होणार आहे. येत्या तीन वर्षात शेतीपंपासाठी सर्वच शेतकरी बांधवांना दिवसा बारा तास वीज देण्याचे शासनाने टार्गेट ठेवले असून यासाठी सौर पंप भरले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 86 ठिकाणी असलेल्या शासकीय जमिनीपैकी 56 ठिकाणी असलेले शासकीय जमिन निश्चित झाली आहे.

मात्र आवश्यक ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी एकरी 30 हजार रुपये मिळतील मग दरवर्षी यामध्ये वाढ होणार आहे.

आता सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव आला असल्याने त्यांनी यावर अंतिम निर्णय घेतल्यानंतर सौर पॅनल बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निश्चितचं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यामुळे दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe