शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मिळणार 70 हजाराच अनुदान ; अहमदनगर जिल्ह्यात उभारले जाणार ‘इतके’ बायोगॅस प्लांट

Published on -

farmer scheme : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी देखील कृषी विभागाकडून अनुदानाची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन अंतर्गत बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अनुदान दिल जाणार आहे. हे अनुदान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वर्ग केल जाणार आहे. येत्या वर्षात राज्यात 5200 बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी आता अनुदानात वाढ करण्यात आली आहे. 70 हजार रुपयांपर्यंतचा अनुदान आता संयंत्र उभारणीसाठी मिळणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांना आकारमानानुसार हे अनुदान मिळणार आहे. अनुदान दहा हजार रुपयांपासून ते 70 हजार रुपयांपर्यंत राहणार आहे.

अडीच हजार बायोगॅस सयंत्रांना शौचालय जोडले जाणार आहेत. शौचालय जोडलेल्या संयंत्रांना 1600 रुपये अधिक अनुदान दिले जाणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, बायोगॅस हे शेणाचा वापर करून तयार केले जाते. बायोगॅस निर्मितीनंतर सलरी म्हणजे शेणाचा वापर खतासाठी केला जाऊ शकतो.

अर्थातच यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. खरं पाहता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय केला जातो. अशा परिस्थितीत पशुपालक शेतकरी बांधव बायोगॅस प्लांट उभारून इंधनाचा प्रश्न सोडवू शकणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात इतके संयत्र उभारले जातील

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 474 बायोगॅस प्लांट उभारले जाणार आहेत. १ घनमीटर क्षमतेपासून २० ते २५ क्षमतेच्या बायोगॅस प्लांट उभारणीसाठी अनुदान मिळणार आहे. बायोगास संयंत्रास ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना आकारमानानुसार ९ हजार ८०० पासून ते ५२ हजार ८०० रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

याशिवाय अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी आकारमानानुसार १७ हजार ते ७० हजार ४०० पर्यंत अनुदान मिळेल. बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त १६०० रुपयांचे अनुदान मिळेल. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेने अनुदानासाठी अतिरिक्त 20 लाख निधी मंजूर केला आहे. हा निधी सेस फंडातून दिला जाणार आहे.

या अतिरिक्त निधीच्या माध्यमातून एक अनुदान देण्याचे प्रावधान केले जाणार असून प्रतिसयंत्र 4000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातील पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी असून याचा त्यांना लाभ होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe