भले शाब्बास मायबाप सरकार..! शेतकऱ्यांचा होणारं लाखोंचा फायदा…! ‘या’ फळाच्या शेतीसाठी मिळणार तब्बल सव्वा लाखांचं अनुदान, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Farmer Scheme: देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न (farmer income) वाढवण्यासाठी शासन दरबारी अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांबरोबरच (traditional crop) फळबागांची लागवड केली तर त्यांना निश्चितच चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थीतीत फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून (central government) तसेच विविध राज्याच्या राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना (farmer) प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे निश्चितच देशात फळबाग लागवडीला चालना मिळणार आहे. केंद्र शासन आपल्या स्तरावर शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करत असून राज्य सरकारे देखील आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी फळबाग लागवडीच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरी बांधवांसाठी फळबाग लागवडीस अनुदान देत आहेत. मित्रांनो ड्रॅगन फ्रुट (dragon fruit crop) हे देखील एक प्रमुख फळबाग पीक आहे. या विदेशी समजल्या जाणाऱ्या फळाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते या फळाची शेती शेतकरी बांधवांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. अशा परिस्थितीत हरियाणा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी (dragon fruit farming) आर्थिक अनुदान दिले जात आहे. ज्यासाठी हरियाणा राज्य सरकारने (hariyana state government) शेतकऱ्यांकडून अर्जही मागवले आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट फार्मिंगसाठी हेक्टरी 1.20 लाख रुपये अनुदानाची तरतूदही करण्यात आली आहे.

अनुदानाची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे बरं…! 

हाती आलेल्या माहितीनुसार, ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे हेतू राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना रोपे लावण्यासाठी 50,000 रुपये आणि ट्रेसिंग सिस्टमसाठी 70 हजार रुपये असे एकूण 1.20 लाख प्रति हेक्टर या दराने अनुदान दिले जाणार आहे.  मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाणार आहे. ज्यामध्ये लागवडीसाठी राखून ठेवलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता 30,000 रुपये दिले जातील 10,000 दुसर्‍या वर्षी आणि 10,000 रुपये लाभार्थी शेतकरी बांधवांना मिळणार आहेत.

ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज…!

मित्रांनो खरे पाहता, ड्रॅगन फ्रूट हे एक विदेशी फळ आहे. मात्र यामध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता त्याची मागणी आपल्या भारतातीय बाजारात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या ड्रॅगन फ्रूटची बाजारात चांगलीच विक्री होत असल्याने ड्रॅगन फ्रुटला चांगला बाजारभाव मिळत आहे परिणामी शेतकऱ्यांना यांचा चांगलाचं फायदा होत आहे. हे फळ केवळ चव आणि आरोग्याच्या दृष्टीनेचं महत्त्वाचे आहे असे नाही, तर इतर फळांच्या तुलनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासही हे फळ उपयुक्त ठरत असल्याचा दावा जाणकार करत आहेत. आपल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये त्याची मागणी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे कमी खर्चात ड्रॅगन फ्रूटची लागवड करणे शेतकऱ्यांनसाठी फायदेशीर ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe