भावा शेतकरी पुत्राचा नांद नाही करायचा!! युपीएससीचा खडतर प्रवास सर करत शेतकरी पुत्र झाला ‘आयएएस’

Ajay Patil
Published:
IAS OMKAR MADHUKAR PAWAR

Success story: युपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक आहे. या परीक्षेसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी अहोरात्र काबाडकष्ट करत असतात. आपल्या राज्यातही अनेक इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी झटत असतात. खरे पाहता, युपीएससी सारख्या कठीण परीक्षेत यशस्वी होऊन राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते.

आई-वडिल देखील आपल्या पाल्याने या खडतर परीक्षेत यशस्वी होऊन मोठे अधिकारी बनावे असे स्वप्न बघत असतात. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या एका शेतकरी (Farmer) कुटुंबातल्या विद्यार्थ्याने देखील यूपीएससी परीक्षा पास करून आयएएस (IAS) बनण्याचे स्वप्न बघितले आणि आज त्याने हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे. तालुक्यातील मौजे सनपाने येथील रहिवाशी ओंकार मधुकर पवार (Omkar Madhukar Pawar) या शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्राने (Farmer Son Became IAS) आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील 2021-22 मध्ये झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा परीक्षेत (UPSC Exam) यश संपादन करून आयएएस अधिकारी होण्याचा किताब पटकावला आहे.

विशेष म्हणजे ओंकार यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 194 वी रँक मिळवली आहे. एवढेच नाही तर ओंकारने जावळी तालुक्यातील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान देखील मिळवला आहे. यामुळे ओंकारचे तालुक्यात सर्व स्तरावर तोंड भरुन कौतुक केले जात आहे. आपल्या पाल्याने यूपीएससी सारख्या खडतर परीक्षेत नेत्रदीपक यश मिळाल्यामुळे ओंकार यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळालेत.

ओंकार हे शेतकरी पुत्र आहेत. घरची आर्थिक परिस्थिती देखील त्यांची बेताची आहे मात्र स्वभावाने जिद्दी व अगदी लहानपणापासून हुशार असलेल्या ओंकारने कठीण परिश्रम करत देशातील सर्वोच्च अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला आहे. ओंकारचे वडील शेती करतात शिवाय संसाराचा गाडा हाकण्यासाठी शेती व्यवसायाला जोड म्हणून फोटोग्राफीचा व्यवसाय देखील ते करत आहेत. त्यांच्या मातोश्री नीलिमा पवार या आपल्या पतीला शेतीव्यवसायात मदत करतात. ओंकारला एकूण दोन बहिणी आहेत. एक बहीण कला क्षेत्रात करिअर घडवीत आहे. तर त्यांची लहान बहीण त्याच्या मार्गदर्शनाखाली यूपीएससीचा अभ्यास करीत आहे.

ओंकार यांनी आपल्या गावात प्राथमिक स्तरापर्यंत शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण हुमगाव येथे व इंजिनीअरिंगचे शिक्षण कराड व पुणे येथे पूर्ण केले. इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सहजच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण ओंकार यांना देशातील सर्वोच्च अधिकारी बनायचे होते यामुळे त्यांनी इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे आपला मोर्चा वळवला.

अभ्यास सुरु झाला पहिल्यांदा परीक्षा दिली आणि मग काय पहिल्याच प्रयत्नात त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट कमांडर इन पॅरामिलिटरी फोर्स यपरीक्षेत यश मिळवले. त्यांची पदासाठी निवड झाली. मात्र त्याला देशातील सर्वोच्च अधिकारी बनण्याचा बहुमान पटकावयाचा होता. मग काय त्याने आपला अभ्यास नियमित सुरूच ठेवला अन नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी झालेल्या परीक्षेत त्याने देशातील सर्वोच्च पोलीस अधिकारी बनवण्याचा मान पटकावला.

तो आयपीएस म्हणून हैदराबाद येथे रुजू झाला. मात्र आयएएस अधिकारीचं होणार दुसरं पद आपल्याला नको या भावनेने पेटून उठलेल्या ओंकारने अथक परिश्रमाला सुरवात केली. अन शेवटी त्याच्या कष्टाला यश आले अन आज ओंकारने आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले. ओंकारने आपल्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe