Farmer Success Story: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरी (Farmer) नेहमीच प्रयोगशील शेतीसाठी चर्चेत असतात. खरं पाहता काळाच्या ओघात वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये (Farming) मोठा बदल केला आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आता पीक पद्धतीत बदल करत आहेत, येथील शेतकरी बांधव स्ट्रॉबेरी तसेच कलिंगडची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) करून चांगले उत्पन्न (Farmer Income) कमवीत आहेत.
वाडा तालुक्यातील शेतकरी बांधव आता विदेशी फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची देखील शेती (Dragon Fruit Farming) करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाडा तालुक्यातील मौजे आमगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीत जरा हटके करण्याच्या विचाराने ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्याचे धाडस दाखवले असून या शेतकऱ्याचे धाडस आज यशस्वी झाले आहे.
मौजे आमगाव येथील शिवराम बसवंत शेतकरी कुटुंबातून आले आहेत. सध्या ते कल्याण मध्ये नोकरी करीत आहेत. नोकरी करत असले तरी देखील त्यांची शेतीची आवड काही कमी झालेले नाही. शेतीमध्ये अगदी लहानपणापासून आवड असल्याने त्यांनी नोकरी सोबतच शेती कसण्याचा देखील निर्णय घेतला आहे. शिवराम यांनी शेतीमध्ये आपल्या ज्ञानाचा वापर करत बदलत्या काळानुसार फळबाग पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. फळपिकं लागवड करायचे मग ड्रॅगन फ्रुट लागवड करू असे ठरवले.
या अनुषंगाने शिवराम यांनी ड्रॅगन फ्रुटची रोपे मागवली. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून ड्रॅगन फ्रुटची रोपे मागवण्यात आली. शिवराम यांची वडिलोपार्जित जमीन नदीला लागून आहे. या वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड केली आहे. सोलापूरहुन मागवलेले ड्रॅगन फ्रुटची 2200 रोप त्यांनी पाऊण एकर क्षेत्रात लावली आहेत. सिमेंटचे स्टॅन्ड उभारून त्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. मित्रांनो एका स्टॅन्ड भोवती त्याने चार ड्रॅगन फ्रुटची रोपे लावली आहेत. 2021 मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली असून शिवराम यांना आतापर्यंत साडे चार लाखांचा खर्च आला आहे.
शिवराम यांनी माहिती देताना सांगितले की, ड्रॅगन फ्रुट ची लागवड केल्यानंतर सुमारे तीन वर्षानंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. अशा पद्धतीने 2023 पर्यंत ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून उत्पन्न मिळणार आहे. ड्रॅगन फ्रुट ची फळे चवीला उत्कृष्ट असल्याने तसेच औषधी गुणधर्मामुळे या फळाला बाजारात काय मागणी असते. ड्रॅगन फ्रुटला चांगला बाजार भाव देखील मिळत असल्याने शिवराम यांना ड्रॅगन फ्रुट लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. निश्चितच वाडा तालुक्यात ड्रॅगन फ्रुट लागवड करून शिवराम यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे.