Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
रविवारी पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होते, ४० ते ४५ रुपये भाव असलेला कांदा रविवारी २२ ते २८ रुपयांपर्यंत गडगडला, यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत दाखल झाले.
त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. भिकाजी जगदाळे, शेतकरी संघटनेचे मुरलीधर जगदाळे, पांडुरंग ढवळे, महेंद्र पांढरकर, राजकुमार मोरे, पांडुरंग पडवळ, कैलास चौधरी, अण्णा मोरे, अर्जुन गंधाकते, ज्ञानदेव पानसरे, भाऊ बोरूडे पोपट मोरे, शिवाजी गंधाकते, संतोष कावरे आदीसह शेतकरी या वेळी उपस्थित होते.
या वेळी सभापती बाबाजी तरटे, सचिव सुरेश आढाव, संचालक चंदन भळगट, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, तुकाराम पडवळ, संतोष दिघे, यांनी पारनेर बाजार समिती शेतकऱ्यांबरोबर असुन, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेल्या निर्णयचा निषेध केला. दरम्यान, शेतकरी व सभापती, व्यापारी यांच्या चर्चेनंतर पुन्हा लिलाव सुरू करण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पारनेर तालुक्यात गारपिटीमुळे काही भागातील कांद्याचे नुकसान झाले, दुसरीकडे आता भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवू.
पारनेर बाजार समिती शेतकऱ्यांबरोबर आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा आम्ही निषेध करतो. शेतकऱ्यांचे म्हणणे असेल तर बुधवारी कांदा लिलाव बंद ठेवू. मात्र, कांदा खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याचा विचार करावा असे पारनेर बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे म्हणाले,
■ कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतल्याने शेतकरी व व्यापारी दोन्ही अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे भाव गडगडले आहे. तातडीने निर्यात बंदी उठवली पाहिजे. – मारूती रेपाळे अध्यक्ष, पारनेर तालुका व्यापारी संघटना