Fertilizer Subsidy: शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात वाजवी आणि परवडणाऱ्या दरात मिळतील खते! खतांच्या अनुदानाचे दर निश्चित

Ajay Patil
Published:

Fertilizer Subsidy:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन यावे यामध्ये शेतकरी विविध प्रकारचे व्यवस्थापन करत असतात व यामध्ये खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. पिकाला आवश्यक पोषक घटकांची कमतरता भासू नये याकरिता रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात.

शेतीचा उत्पादन खर्चामध्ये सर्वात जास्त खर्च हा रासायनिक खतांवर होत असतो. त्यामुळे साहजिकच रासायनिक खतांच्या किमतींचा परिणाम हा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नफ्यावर होतो.परंतु आता रासायनिक खतांच्या अनुदानाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला

असून नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम 2024 करिता म्हणजेच एक एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांवर पोषणतत्त्व आधारित अनुदान दर निश्चित करायला मंजुरी दिलेली आहे व एवढेच नाही तर या पोषण तत्त्वावर आधारित अनुदान योजनेमध्ये आता तीन नवीन खतांचा समावेश करण्याला देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

 काय मिळेल शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा?

पोषण तत्त्वावर आधारित अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना अनुदानित तसेच परवडणाऱ्या व वाजवी दरामध्ये खत उपलब्ध होण्यास मदत होईल. एवढेच नाही तर खत आणि निविष्ठांच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय किमती आहेत त्यामधील होत असलेल्या बदलानुसार आता फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण देखील केले जाणार आहे.

या योजनेमध्ये आता तीन नवीन खतांचा म्हणजेच खत श्रेणीचा समावेश करण्यात आला असल्यामुळे मातीचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी मदत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमिनीला कोणत्या पोषक तत्त्वांची गरज आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना त्या त्या पोषक तत्वांनी युक्त असलेली खते निवडण्याकरिता पर्याय मिळणार आहेत.

 खतांच्या अनुदानाकरिता अंतरिम अर्थसंकल्पात 24 हजार 400 कोटी रुपये रकमेची तरतूद

2024 च्या खरीप हंगामाकरिता आता मंजूर झालेल्या दरानुसार फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर अनुदान मिळणार आहे. या अनुदानापोटी या योजनेकरिता तात्पुरती अर्थसंकल्पीय म्हणजेच अंतरिम अर्थसंकल्पीय गरज अंदाजे 2400 कोटी रुपयांची असणार आहे.

ही योजना राबवण्यामागील जर सरकारची भूमिका पाहिली तर यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये फॉस्फेटिक व पोटॅसिक खते मिळतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 25 प्रकारची फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खते अनुदानित दरामध्ये उपलब्ध करून देणार आहे.

तसेच युरिया व डीएपी तसेच एमओपी आणि सल्फर ही खते आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील बदलानुसार सरकारच्या माध्यमातून एक एप्रिल ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधी करिता फॉस्फेटिक आणि पोटॅसिक  खतांवर खरीप हंगाम 2024 करिता पोषण तत्त्व आधारित अनुदान दर मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

यासोबतच या योजनेत तीन नवीन खतांच्या श्रेणींचा देखील समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आता मंजूर आणि अधिसूचित दरानुसार खत उत्पादक कंपन्यांना अनुदान मिळणार आहे व शेतकऱ्यांना ते परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe