Goat Rearing Tips : तज्ञांचा मोलाचा सल्ला ! ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर शेळ्यांचे दूध उत्पादन वाढेल, होणार लाखोंची कमाई

Ajay Patil
Published:
Goat Farming Tips

Goat Rearing Tips : संपूर्ण जगात शेळी पालन (Goat Farming) केले जाते. आपल्या भारतात शेळी पालन सर्वाधिक केले जाते. देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत.

जगात उत्पादित होणाऱ्या एकूण शेळीच्या दुधात (Goat Milk) मोठा वाटा आपल्या भारत देशाचा आहे. भारत प्रमुख शेळी दूध उत्पादक देश आहे. जगात शेळीच्या दुधाचे एकूण उत्पादन 15.26 मेट्रिक टन आहे, त्यात भारताचा वाटा 5.75 मेट्रिक टन आहे.

अलीकडच्या काळात शेळीच्या दुधाची मागणी खूप वाढली आहे आणि याचे कारण त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल वाढलेली जागरूकता आहे. गाईचे दूध लहान मुलांसाठी सर्वोत्तम असल्याचे म्हटले जात असले तरी, काहींना गायीच्या दुधात असलेल्या लैक्टोजची अॅलर्जी असते हे फार कमी लोकांना माहीत आहे.

अशा लोकांसाठी शेळीचे दूध वरदान आहे, कारण त्यात लॅक्टोजचे प्रमाण कमी असते. शेळीचे दूध पचायलाही सोपे आहे आणि त्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. शेळीच्या दुधाची मागणी ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने शेळीच्या दुधाचे उत्पादन (Animal Care) वाढल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा (Farmer Income) मिळू शकतो.

शेळीचे दूध उत्पादन कसे वाढवायचे बर?

साधारणपणे शेळी दिवसात 1-2 लिटर दूध देते जे इतर दुभत्या जनावरांच्या तुलनेत खूपच कमी असते, परंतु शेळीच्या दुधाला मागणी जास्त असते, त्यामुळे शेळीपालकांना चांगला भाव मिळू शकतो. शेळीचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेळीपालकांनी काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, त्या पुढीलप्रमाणे.

सर्वप्रथम शेळीची जात निवडताना हे लक्षात ठेवावे की, दुसऱ्या जातीची शेळी आणण्याऐवजी तुम्ही ज्या भौगोलिक भागात शेळी पाळणार आहात त्याच भागातील शेळीची जात निवडा.

शेळ्यांच्या प्रजननासाठी चांगल्या प्रतीच्या शेळ्या निवडा आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शेळ्यांसोबत प्रजनन करा, ज्यामुळे जातीमध्ये सुधारणा होईल.

गाभण शेळ्यांना इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवा आणि त्यांच्या खाद्याची विशेष काळजी घ्या. त्यांना अधिक हिरवा आणि पौष्टिक आहार द्या.

शेळ्यांना 100-200 ग्रॅम जास्तीचे धान्य गर्भधारणेच्या 15 दिवस आधी द्यावे, जेणेकरून त्यांचे शरीराचे वजन चांगले राहील.

शेळ्या गरोदरपणाच्या शेवटच्या अवस्थेत कमी चारा खातात, त्यामुळे त्या काळात त्यांना अधिक पोषक आहार द्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe