आजकाल आपल्याला समाजामध्ये असे अनेक तरुण दिसून येत आहेत की त्यांनी विविध प्रकारच्या क्षेत्राशी निगडित असलेले उच्च शिक्षण घेतलेले आहे. परंतु नोकरी न करता ते शेती सारख्या व्यवसायामध्ये करियर करून त्या माध्यमातून चांगल्या आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
यामध्ये काही तरुणांनी तर मोठ्या पॅकेजेच्या नोकऱ्यांना राम राम ठोकत शेती व्यवसायाची कास धरल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यामुळे शेती व्यवसायाला फायदा असा झाला आहे की या तरुणांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये करायला सुरुवात केली असून निर्यातक्षम असे दर्जेदार उत्पादन ते या माध्यमातून घेत आहेत.
याच मुद्द्याला धरून जर आपण मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथील हर्षित गोधा या तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती इतर युवकांना प्रेरणादायी अशी आहे. हर्षितने ब्रिटनमध्ये बीबीए पूर्ण केले व इजराइल शेती तंत्राची माहिती घेऊन भारतात आला व शेती करायला सुरुवात केली. त्या अनुषंगाने या लेखात आपण हर्षित गोधा त्याची यशोगाथा बघणार आहोत.
अँव्हाकेडो उत्पादनातून आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोपाळ येथील हर्षित गोधा त्याने ब्रिटन मधील लंडन येथे बीबीएचे शिक्षण पूर्ण केले व अचानकपणे शेती करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आला. यामध्ये एकदा हर्षित जेव्हा लंडनमध्ये शिक्षण घेत होता तेव्हा इस्रायल मधून आयात केलेले अँव्हाकेडोचे पॅकेट त्याने पाहिले व त्या माध्यमातून त्याला शेती तंत्राबद्दल उत्सुकता निर्माण झाली.
परंतु हर्षितची उत्सुकता फक्त उत्सुकतेपुरतीच राहिली नाही तर त्याने इजरायली तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी इस्त्रायलच्या शेतकऱ्यांकडून त्याबाबत पूर्ण माहिती घेऊन ॲव्हकेडो शेती करायचा निर्णय घेतला व 2019 मध्ये भोपाळला येऊन इंडो इस्रायली ॲव्हकेडो नावाची कंपनी सुरू केली व आज या शेतीतून तो चांगले उत्पन्न घेत आहे.
जर आपण हर्षित याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर संपूर्ण कुटुंब वकील व्यवसायात असून हर्षित देखील उच्चशिक्षित आहे व त्याने ब्रिटनमधून बीबीए पूर्ण केले आहे. परंतु तरी देखील त्यांनी इस्त्रायली पद्धतीने शेती शिकून ॲव्हकेडोची शेती सुरू केली व इस्राईलच्या शेतकऱ्यांकडून त्याबाबतची ट्रेनिंग घेतले. व्यावसायिक पद्धतीने या फळाची शेती करत असून हे एक विदेशी फळ आहे.
भोपाळ मध्ये हर्षितने पाच एकर क्षेत्रावर एक हजार आठशे ॲव्हकेडोची रोपांची लागवड केली असून या पद्धतीने शेतीला सुरुवात केली आहे. यामध्ये भोपाळ विमानतळा जवळ त्याने स्वतःची पाच एकर बाग तयार केली असून 2023 मध्ये लागवड केलेल्या या बागेला आता फळधारणा होऊ लागली आहे.
इतकेच नाही तर हर्षित अरुणाचल प्रदेश, सिक्कीम तसेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रोपांची विक्री देखील करतात व त्यांना या शेतीबद्दलचा मोफत सल्ला देखील देतात. हर्षतने ब्रिटनमधील इंटर्नशिप सोडली व शेती शिकण्यासाठी थेट इस्त्राइल गाठले व शिक्षण पूर्ण करून भारतात येऊन इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त दरात ॲव्हकेडो पिकवण्याचा निर्णय घेतला.
हर्षित मिळवतो वर्षाला एक कोटी रुपये
रोपे विक्रीतून हर्षितचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये इतके असून या सगळ्या व्यवसायामध्ये त्याची उलाढाल चांगली होत असल्यामुळे त्याला आता ॲव्हकेडोची शेती शंभर एकरापर्यंत वाढवायचे आहे. हर्षित याच्या डोक्यामध्ये कायम स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे असे होते व त्याने ते केली देखील. हर्षित आता भोपाळ मध्ये शंभर एकराची दुसरी बाग लावत असून माध्यमातून वर्षाला दहा कोटी रुपयांची उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्याला आहे.